येवला(नाशिक) - शरद पवार हे राष्ट्रपती झाले तर आनंदाची गोष्ट असून महाराष्ट्राकरिता गर्वाची बाब राहील असे, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ते येवला येथे सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
उद्धव ठाकरे यांना ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीसंदर्भात आमंत्रण दिले आहे. यावेळी राष्ट्रपती पदाकरिता उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव सुचविले जाणार आहे. ममता बॅनर्जीनीं सर्व विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्रांना आमंत्रित केले आहे. त्यांच्या सोबत मीटिंग घेऊन राष्ट्रपतीपदासाठी कोणाला करावे, यावर चर्चा करण्यात येणार आहे असल्याचे भुजबळ म्हणाले.
राष्ट्रपती पदाची निवडणूक कधी - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली ( Presidential Election 2022 ) आहे. यासाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून, 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. घटनेच्या अनुच्छेद 62 चा संदर्भ देत याबाबतची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.