नाशिक : गणेशोत्सवानंतर आता सर्वांना नवरात्रोत्सवाचे (Navratri festival) वेध लागले आहे. या निमित्ताने नाशिक शहरात अनेक ठिकाणी दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी लागणाऱ्या घागऱ्याला (huge demand for rental pitchers) मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. थेट घागरे खरेदी करण्यापेक्षा, रोज नवनवीन घागरे भाडेतत्त्वावर घेण्याकडे युवतींचा कल असल्याचे दुकानदारांनी सांगितले.Navratri 2022
100 हुन अधिक प्रशिक्षण वर्ग : मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक मध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या नऊ दिवसात घरोघरी देवींच्या घटाची स्थापना केली जाते. तसेच वेगवेगळ्या देवींच्या मंदिरात भाविकांची पूजा विधी, दर्शनासाठी मोठी गर्दी असते. तसेच यंदा दोन वर्षानंतर सरकारने कोरोनाचे निर्बंध दूर केल्याने दांडिया प्रेमींमध्ये उत्साह दिसून येत आहे. नाशिक शहरात 100 हुन अधिक ठिकाणी दांडिया, गरबा प्रशिक्षण वर्ग सुरू असून; यात हजारो युवक,युवती प्रशिक्षण घेत आहेत. तसेच दांडिया साठी खास पेहराव म्हणून आधीच ड्रेसची पसंती केली जात आहे. यात यंदा युवतींचा राजस्थान व गुजरात पेहराव असलेल्या लेहेरिया घागरा, वेलवेट घागरा, डबल घेराचा घागरा, शॉर्ट घागरा, रंगीला घागरा, इंडो वेस्टन आदी घागरांना मागणी आहे. तसेच युवकांन कडून धोती जॅकेट, केडिया जॅकेट, थ्री पीस, फोर पीसला अधिक पसंती आहे. अशात कारागिर देखील गेल्या चार महिन्यांपासून घागरा बनवण्यात व्यस्त होते.
भाडेतत्त्वावर घागऱ्यांना अधिक मागणी : दांडिया साठी थेट नवीन घागरे खरेदी करण्यापेक्षा रोज नवनवीन घागरे, धोती जॅकेट भाडेतत्त्वावर घेण्याकडे युवक, युवतींचा कल अधिक असल्याचे दुकानदारांनी सांगितले. नवीन घागऱ्यांच्या किमती 1500 पासून ते 10 हजार पर्यंत आहेत,अशात भाडेतत्त्वावर घेतलेले ड्रेस नऊ दिवस वेगवेगळे घालण्याचा आनंद ही त्यांना मिळणार आहे. 24 तासांसाठी 350 ते 1000 रुपयांमध्ये हे ड्रेस भाडेतत्त्वावर दिले जात असून; आता पर्यंत 50 हुन अधिक ग्रुप बुकींग झाल्याचे ड्रेस डिझायनर दीपक माहेगावकर यांनी सांगितले.Navratri 2022