ETV Bharat / city

Shravan 2022 त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी - त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

नाशिक येथे आज श्रावण Shravan 2022 महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार असल्याने नाशिक येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात Trimbakeshwar Mahadev Temple भाविकांनी मोठी गर्दी Huge crowd of devotees केली राज्यभरातून भावीक या ठिकाणी दाखल झाले असून मंदिर परिसरात पहाटे पासून भाविकांच्या लांब रांगा लागल्या आहेत श्रावण सोमवार निमित्त मंदिरात महापूजा अभिषेक आरती आणि अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

Shravan 2022
त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर
author img

By

Published : Aug 15, 2022, 5:01 PM IST

नाशिक आज श्रावण Shravan 2022 महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार असल्याने नाशिक येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात Trimbakeshwar Mahadev Temple भाविकांनी मोठी गर्दी Huge crowd of devotees केली. राज्यभरातून भावीक या ठिकाणी दाखल झाले असून मंदिर परिसरात पहाटे पासून भाविकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. श्रावण सोमवार निमित्त मंदिरात महापूजा अभिषेक आरती आणि अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात पुजा करतांना पुजारी

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा महत्त्व त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली जाते. मात्र श्रावण महिन्यातील तिसऱ्या श्रावणी सोमवारी ही प्रदक्षिणा केल्यास अधिक फलप्राप्ती होते. असे म्हणटले जाते म्हणून जिल्ह्याभारतातून लाखो भाविक या दिवशी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल होतात. बहुतांश भाविक रविवारी रात्री बारा वाजे नंतर कुशावर्त कुंडावर स्नान करून त्र्यंबक राजाचे दर्शन करून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेस सुरुवात करतात. 20 किलोमीटरच्या फेरी दरम्यान अनेक तीर्थ दिसतात. त्यातील बहुतेक तीर्थ आजकालच्या ओघात लुप्त झालेत. प्रदक्षिणेचा मार्ग देखील सोयीचा ठरेल असा त्यात बदल झाला आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा फेरी करतांना भगवान भोलेनाथाचे नामस्मरण करत भाविक ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. या प्रदक्षिणा मार्गावर सरस्वती तीर्थ रामतीर्थ नागातीर्थ निर्मल तीर्थ व प्रयाग तीर्थ आदी मंदिरे मंदिरे आहेत. जेथे भाविक नतमस्तक होतात. तसेच डोंगर दऱ्या व निसर्गरम्य वातावरण मन प्रसन्न करते आणि भाविक या ठिकाणी सहकुटुंब ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यंदा एसटी महामंडळाच्या वतीने त्रंबकेश्वर साठी 300 ज्यादा बसेस ची व्यवस्था केली आहे. तसेच या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय.

त्र्यंबकेश्वर मंदिर महत्व त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व 12 ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. हे मंदिर नाशिक शहरापासून 28 किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे. पवित्र गंगा गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वर मध्येच आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत ज्या वेदशाळा संस्कृत पाठशाळा कीर्तन पाठशाळा प्रवचन संस्था चालवितात. पौराणिक कथेनुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले. जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले.

ब्रह्मगिरी पर्वतावर एके काळी गौतम ऋषींचे आश्रम होते. केलेल्या अपराधातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या तपश्चर्येवर प्रसंन्न होऊन महादेवांनी त्रिमूर्ती ज्योतिर्लिंग स्वरूप धारण केले आणि तिथेच विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाशस्तंभ दर्शवतो. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे. त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत. ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णु महेश विद्यमान आहेत. ते स्थानिक माहितीप्रमाणे 350 वर्षांपासून विद्यमान आहे. या ज्योतिर्लिंगाची त्रिकाल पूजा केली जाते.

हेही वाचा श्रावण सोमवार 2022 श्रावण सोमवार निमित्य उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात विशेष सजावट व पुजा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.