नाशिक - पोलिसांना वेगळे आदेश देण्याची गरज नाही. पोलिसांनी त्यांचे काम केले पाहिजे. सोमैयांवर दगडफेक ( Dilip Walse Patil on kirit somaiya) कोणी केली याची चौकशी सुरू आहे. राणांबाबतही चौकशी सुरू आहे. राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी अजून कोणी केलेली नाही, पण त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचा दावा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil on presidential rule ) यांनी केला असून, त्यामुळे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा - Pravin Darekar on Load Shedding : भारनियमनला महाविकास आघाडी जबाबदार - प्रवीण दरेकर
पोलीस अकादमीच्या दीक्षांत ( Dilip Walse Patil news nashik ) सोहळ्यासाठी नाशिकात आले असता दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil nashik visit ) यांनी राणा विरुद्ध शिवसेना वादावर प्रतिक्रिया दिली. कालच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये हनुमान चालीसाच्या नावाने दंगा करण्यात आला. एप्रोप्रिएट ॲक्शन म्हणून राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली. काल रात्री जी घटना घडली त्या संदर्भात देखील पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस कारवाई करतील. कालची घटना दुर्दैवी, मात्र सर्वांनी समजूतदारपणा दाखवावा व सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्री पाटील यांनी केले. तसेच, मुख्यमंत्री, संजय राऊत यांच्याविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. त्यांच्यावर पोलीस चौकशी करून कारवाई करतील, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा - Nashik Online Gamble Case : बिंगो, रौलेट जुगार चालवणाऱ्या दोघांना अटक, ४५ लाखांची केली फसवणूक