ETV Bharat / city

शिरसगावातील आरोग्य केंद्राची चौकशी होईल- यशोमती ठाकूर - Health Center Shirasgaon

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या. त्यानंतर अनेक महिलांना थंडीच्या दिवसात खाली झोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

यशोमती ठाकूर
यशोमती ठाकूर
author img

By

Published : Jan 22, 2021, 10:17 PM IST

मुंबई - कुटुंब नियोजन आणि त्यासाठीचा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा असतो. परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये एका सरकारी रुग्णालयात झालेला प्रकार हा भयंकर आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज मुंबईत दिली.

हा विषय अत्यंत गंभीर आहे-

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिरसगाव आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या. त्यानंतर अनेक महिलांना थंडीच्या दिवसात खाली झोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकूर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, हा विषय अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे राज्यात अशा प्रकारचा विषय राज्यात यापुढे होणार नाही अशा प्रकारची ही कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

कारवाई करण्याचे आदेश-

दरम्यान, शिरसगाव येथील आरोग्य केंद्रात झालेल्या प्रकरणाची गंभीर दखल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दुपारी याविषयी संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत असे प्रकरणे राज्यात यापुढे कुठल्याही आरोग्य केंद्रात होणार नाही, यासाठी सरकार खबरदारी घेईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

शस्त्रक्रियेसाठी ४१ महिलांनी नोंदणी

कोरोनाचे संकट आल्यामुळे मधल्या काळात जिल्ह्यातील कुंटुंबनियोजन शस्त्रक्रिया थांबल्या होत्या. लॉकडॉऊन शिथील झाल्यानंतर डिसेंबरपासून जिल्हयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांना सुरुवात झाल. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा नियमित स्वरुपाचा कार्यक्रम असून एप्रिल ते मार्चपर्यंत नियमित स्वरुपात याची अंमलबजावणी करण्यात येते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्वर तालुकयातील शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये देखील कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ४१ महिलांनी नोंदणी केली होती. प्राथमिक आरोग्य केद्रातील वैद्यकीय अधिका-यांनी बेडच्या उपलब्धतेबाबत रुग्णांना पूर्वकल्पना दिली होती. मात्र बेडअभावी काही स्त्री रुग्णांची गैरसोय झाल्याचे निर्दशनास आल्याने अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्यामार्फत याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करू, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा- राज्यात २ हजार ७७९ नवीन कोरोना रुग्णांची वाढ; ५० रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.