ETV Bharat / city

निवडणुका जवळ आल्या की हिंदू मुस्लीम वाद निर्माण केला जातो, लोकांनी त्यापासून दूर राहावे - छगन भुजबळ

author img

By

Published : Nov 13, 2021, 5:51 PM IST

लोक आत्ताच कोरोनातून, लॉकडाऊनमधून बाहेर आले आहेत, त्यात आता असा वाद लोकांना परवडणारा नाही. हिंदू मुस्लीम वाद पेटवण्याचा प्रयत्न भविष्यात होऊ शकतो, लोकांनी यापासून दूर राहिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी त्रिपुरा (tripura violence) येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर दिली.

Guardian Minister Chhagan Bhujbal
पालकमंत्री छगन भुजबळ येवला

येवला (नाशिक) - निवडणुका जवळ येत असतील आणि विकासाची कोणतीच कामे हातात नसतील किंवा केली नसतील तेव्हा हिंदू मुस्लीम वाद निर्माण केल्या जातो. त्याचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जातो. यातून आपण बाहेर यायला हवे. लोक आत्ताच कोरोनातून, लॉकडाऊनमधून बाहेर आले आहेत, त्यात आता असा वाद लोकांना परवडणारा नाही. हिंदू मुस्लीम वाद पेटवण्याचा प्रयत्न भविष्यात होऊ शकतो, लोकांनी यापासून दूर राहिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी त्रिपुरा (tripura violence) येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवर दिली.

पालकमंत्री छगन भुजबळ

हेही वाचा - ST Workers strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा - मंत्री भारती पवार

आज पालकमंत्री छगन भुजबळ येवला येथे आढावा बैठक, तसेच विकास कामाच्या उद्घाटनासाठी आले होते, यावेळी त्यांनी प्रत्रकारांच्या प्रश्नाला सदर उत्तर दिले. एसटी संपावर विचारले असता, एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत, फक्त विलिनीकरणाची मागणी राहिली आहे. भाजपच्या काळात मुनगंटीवार यांनी देखील विलिनीकरणाची मागणी अमान्य केली होती. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाणारे फायदे द्यायला तयार आहे. संप सुरू करणे सोपे आहे मात्र, ते कुठे थांबवायचे हे माहिती असायला हवे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत असल्याने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत 418 खासदार निवडून येण्याचा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिक येथे भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला. यावर भुजबळ म्हणाले की, प्रत्येक पुढारी सांगणार की, आमचे एवढे खासदार येतील, आम्ही पण सांगणार की, आमचे 30 येतील 40 येतील. अजून वेळ आहे. अनेक ठिकाणी भाजपची घसरण होत असून दोन, तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात भाजपची घसरण होणार आहे.

हेही वाचा - नाशिक शासकीय रुग्णालयात गरोदर महिलेला मारहाण ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.