नाशिक - शहर आणि परिसरात आज रविवार (दि. 7 ऑगस्ट)रोजी पावसाचा जोर कमी असला तरी पंचवटी परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागातून येणारी गोदावरीची उपनदी वरुणा (वाघाडी) पूर आला. पुराचे पाणी गाडगे महाराज पुलाखाली वेगाने आले. यामुळे नदीपात्रात उभ्या असलेल्या काही वाहनांपैकी एक रिक्षा एक कार, पाण्यात वाहून गेली.
गोदा काठावरील दुकानांना आणि वाहनांना अचानक आलेल्या पुराने घातला वेढा - नाशिक शहरात अचानक पडलेल्या मुसळधार पावसाने गोदावरीला पूर आला आहे. गोदा काठावरील दुकानांना आणि वाहनांना अचानक आलेल्या पुराने वेढा घातला आहे. नागरिकांनी आणि स्थानिक जीवरक्षक दलांनी पाण्यात प्रवेश करून पाण्यात वाहून जाणारी एक रिक्षा बाहेर काढली. मात्र, एक रिक्षा आणि कार गाडगे महाराज पुलाखाली गोदावरी नदीपात्रात बुडाली आहे. तसेच, येथील नारोशंकर मंदिराच्या शेजारी नदीपात्रात असलेल्या गोपालदास समाधी मंदिराला लागून एक रिक्षा पाण्यात अडकून पडली आहे.
मोठ्या प्रमाणात पाऊस झाला - पुरात सापडलेल्या एका रिक्षामध्ये प्रवासी होते. अचानक पाणी वाढल्याने त्यांनी बाहेर उड्या मारल्या. स्थानिकांनी आणि जीवरक्षक दलांच्या जवानांनी त्यांना वाचवल्याने मोठी दुर्घटना टळली.दरम्यान, गोदावरीची उपनदी असलेल्या वाघाडीला अशा प्रकारे अचानक पूर येण्याची ही गेल्या काही वर्षांमधील पहिलीच वेळ आहे. नाशिकच्या मुख्य शहरात आज कमी पाऊस असला तरी गोदावरीचे पाणलोट क्षेत्र असलेल्या भागापैकी नाशिकच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. हेच पाणी वाघाडी नदीमधून वाहत येत गोदावरीला मिळाले. त्यामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली.
हेही वाचा - 'या' कारणाने 'हर घर तिरंगा' मोहिम वादात; राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचा काँग्रेसचा आरोप