ETV Bharat / city

तिचा येतो अश्लील व्हिडिओ कॉल... नंतर करते ब्लॅकमेल - ब्लॅकमेल न्यूज

तरुणाईकडून सर्वाधिक विविध सोशल मीडियाचा उपयोग केला जातो. यात सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ घालवणार्‍या तरुणांना काही भामट्यांकडून टार्गेट केले जाते.

nashik crime
सोशल मीडिया
author img

By

Published : Feb 4, 2020, 5:27 PM IST

Updated : Feb 4, 2020, 5:43 PM IST

नाशिक - गेल्या काही दिवसात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. चांगल्या कामासोबतच वाईट कामांसाठीही सोशल मीडियाचा वापर केला जातो. दरम्यान, असाच एक अनुभव नाशिकच्या तरुण वकिलाला आला. एका अनोळखी नंबरवरून एका मुलीने त्याला व्हिडिओ कॉल केला. तोंडाला कपडा बांधलेल्या या मुलीने काही वेळातच अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. या तरुणाने देखील काही वेळ हा व्हिडिओ बघितला. मात्र, त्यावेळीच त्या मुलीने या मुलाचा व्हिडिओ बघतानाचा प्रसंग स्क्रिन रेकॉर्डरच्या मदतीने रेकॉर्ड केला. त्यानंतर तो यू ट्यूबवर टाकत पैशाची मागणी केली. तीन हजार रुपये दिले तरच हा व्हिडिओ काढेल, असे म्हणत तरुण वकिलाला तिने ब्लॅकमेल केले. नंतर तरुणाने सायबर पोलिसात धाव घेतली.

प्रतिनिधी कपिल भास्कर यांनी घेतलेला आढावा

हेही वाचा - हिंगणघाट 'छपाक': '...तर महिलांवर होणारे हल्ले कमी झाले असते'

तरुणाईकडून सर्वाधिक विविध सोशल मीडियाचा उपयोग केला जातो. यात सोशल मीडियावर जास्तीत जास्त वेळ घालवणार्‍या तरुणांना काही भामट्यांकडून टार्गेट केले जाते. त्यानंतर बदनामी टाळण्यासाठी तरुणाईकडून पैसे दिले जातात. त्यामुळे फसवणूक होणाऱ्यांमध्ये तरुणाईची संख्या मोठी असल्याचे सायबर तज्ज्ञ सांगतात.

दरम्यान, व्हिडिओ कॉल करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक वापरून कॉल केला जातो. प्ले स्टोरवरून कॉलिंग करण्यासाठीचे अॅप्लिकेशन अथवा इंटरनेटवरील फ्री कॉलिंग करणाऱ्या वेबसाईटचा वापर करून व्हिडिओ कॉल करत फसवणूक केली जाते.

#कशी काळजी घ्याल -

  1. फोन किंवा व्हिडिओ कॉल येतो, तेव्हा त्याच्या सुरुवातीला नेहमी कंट्री कोड असतो, जर तुम्हाला सुरुवातीला प्लस 92, 93, 374 अशाप्रकारे जर सुरुवातीला दिसले असेल, तर तुम्ही असे कॉल उचलू नका. कारण, हे इंटरनॅशनल कॉल असू शकतात आणि तुमची फसवणूक होवू शकते.
  2. कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, तसेच कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सायबर तज्ज्ञांनी केले आहे.

Intro:..तिचा येतो "न्यूड व्हिडीओ कॉल".आणि नंतर करते ब्लॅकमेल...

Body:गेल्या काही दिवसात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे ,या सोशल मीडियाचा वापर जितका चांगल्या कामासाठी होतोय,तर काही गुन्हेगार वाईट कामासाठी सुद्धा करतांना दिसून येत आहे ,असाच एक अनुभव नाशिकच्या तरुण वकीलाला आला,एका अन नोन नंबर वरून एक मुलींनी व्हिडीओ कॉल केला,तोंडाला कपडा बांधलेल्या ह्या मुलींने काही वेळातच अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली,ह्या तरुणाने देखील काही वेळ हा व्हिडिओ बघितला,मात्र त्या नंतर जे घडलं त्यामुळे ह्या वकिलाच्या पाय खालची वाळूच सरकली...त्या मुलीने ह्या मुलाचा व्हिडिओ बघतांनाचा प्रसंग स्क्रिन रेकॉर्डर च्या साहाय्याने रेकॉर्ड करत, तो यू ट्यूब वर टाकत पैशाची मागणी केली...3000 रुपये दिले तरच हा व्हिडीओ काढेल असं म्हणत ह्या तरुण वकिलाला ब्लॅकमेल केलं,ह्या नंतर ह्या तरुणाने सायबर पोलिसात धाव घेतली..

तरुणाईकडून सर्वाधिक विविध सोशल माध्यमांचा उपयोग केला जातो,यात सोशल माध्यमावर जास्तीत जास्त वेळ घालवणार्‍या तरुणांनां टार्गेट केले जाते,आणि बदनामी टाळण्यासाठी तरुणाईकडून पैसे दिले जाते,त्यामुळे फसवणूक होणाऱ्यांमध्ये तरुणाईची संख्या मोठी असल्याचं सायबर तज्ञ सांगतात...

व्हिडिओ कॉल करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निक वापरून कॉल केला जातो, प्ले स्टोर वरून कॉलिंग करण्यासाठीचे एप्लीकेशन अथवा इंटरनेटवरील फ्री कॉलिंग करणाऱ्या वेबसाईट वापर करून व्हिडिओ कॉल केला जात फसवणूक केली जाते...

#कशी काळजी घ्याल.

फोन किंवा व्हिडिओ कॉल येतो, तेव्हा त्याच्या सुरुवातीला नेहमी कंट्री कोड असतो,जर तुम्हाला सुरुवातील प्लस 92,93,374 अशाप्रकारे जर तुम्हाला सुरुवातीला दिसले असेल, तर तुम्ही असे कॉल रिसीव करू नका, कारण हे इंटरनॅशनल कॉल असू शकतात,आणि तुमची फसवणूक होवू शकते..इंटरनेट वापर करताना काळजी घ्यावी,कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, तसेच कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधावा असा आव्हान सायबर तज्ञनी केलं आहे.

वन टू वन
तन्मय दीक्षित सायबर तज्ञ

Conclusion:
Last Updated : Feb 4, 2020, 5:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.