नाशिक - शहरामध्ये सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मात्र, यंदाच्या मिरवणुकीत शिवसेवा मंडळाने वाराणसीमधून आमंत्रित केलेले श्री काशी विश्वनाथ महाकाल भोले तांडव डमरू वादन पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हेही वाचा - गणेश विसर्जनासाठी नाशिक महानगरपालिका सज्ज, मूर्ती दान करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन
गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील अनेक मंडळांनी आपल्या मंडळाच्या गणपतीला निरोप देण्यासाठी अनेक वाद्य पथकांना आमंत्रित केले आहे. मात्र, सध्या या मिरवणुकीत वाराणसीच्या भोले तांडव डमरू वादन पथकाचे विशेष आकर्षण आहे. या पथकाकडून भोले तांडव नृत्य सादर करून डमरू वादन करण्यात येत आहे. यामुळे मिरवणुकीत गणपतीच्या नामोच्चरासह भोलेंचा जयजयकार दिसून येत आहे.
हेही वाचा - गणपती विसर्जन मिरवणूक: नाशिक ढोलच्या तालावर वाहतूक पोलिसांनी धरला ठेका
डमरू वादन पथकातील कलाकार अंगाला भस्म लावून भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी डमरू वादन करत तांडव नृत्य करत आहेत. त्यामुळे हे डमरू वादन पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली आहे.