नाशिक - जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील आंबोली येथे वनपरिक्षेत्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आज सिनेस्टाईल पाठलाग करत बिबट्याच्या कातडीचा तस्करी पकडली. त्यांनी मोठे रॅकेट उघडकीस आणले. बिबट्याच्या कातडीसह चार संशयित आरोपींना गजाआड केले.
मोठे राकेट कार्यरत - नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांना बिबट्याच्या कातडीची तस्करी होत असल्याचे मोठे राकेट कार्यरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गेल्या महिन्याभरापासून वन विभाग या रॅकेटच्या शोधात होते. अशातच गुप्त माहितीच्या आधारे इगतपुरीच्या तालुक्यातील आंबोली भागात चारजण बिबट्याची कातडी विक्री करण्यासाठी आल्याचे समजले. यावेळी बनावट ग्राहक बनून वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा 18 लाखांत बिबट्याची कातडी विक्रीचा व्यवहार झाला (leopard skin worth 18 lakhs in Nashik). प्रत्यक्ष भेटीत वन अधिकारी आणि संशयितांना मध्ये झटपट झाली. (Four arrested with leopard skin) यावेळी वन अधिकाऱ्यांनी हवेत दोन राउंड फायर करत चार संशयितांना ताब्यात घेतले.
आंतराष्ट्रीय कातडी तस्करी रॅकेट - वन विभागाला वबिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे आंतरराष्ट्रीय रॅकेट कार्यरत असल्याचा संशय असून ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांमध्ये काही परप्रांतीय नागरिकांच्या देखील समावेश आहे,यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या चार जणांची सखोल चौकशी सुरू आहे,चौकशीनंतर अधिक माहिती समोर येईल असं वन विभागाने सांगीतलं आहे.
हेही वाचा - Umesh Kolhe murder case - उमेश कोल्हे हत्त्या प्रकरण; एनआयएचे पथक पुन्हा अमरावतीत