नाशिक -नाशिकच्या ओझर ( Nashik Ozar Fire ) येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हद्दीतील नाशिक विमानतळाला असलेल्या रणवेच्या 100 मीटर अंतरावर असणाऱ्या जवळपास 50 एकर परिसरात वाळलेल्या गवताला शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आग ( Nashik Airport runway near fire ) लागली. घटनेची माहिती मिळताच एचएएलचे तीन अग्निशमन बंब तसेच नाशिक, पिंपळगाव बसवंत, येवला येथील प्रत्येकी एक तर येथील एअरफोर्सच्या दोन अग्निशमन बंबाच्या सहाय्याने तीन तासांचा प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली.
शॉर्टसर्किटमुळे आग - शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, या आगीत किती नुकसान झाले याची माहिती अद्याप समजू शकले नाही. मात्र या आगीत 50 एकर क्षेत्रावरील वृक्ष व गवताची हानी झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी लागली होती आग - दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या एअरपोर्ट परिसरात अचानक वनवा पेटला होता, यावेळी हजार हेक्टरवर पसरले आगीने रौद्ररूप धारण केले होते ,जवळपास विमानतळ असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता, अशात आसपासच्या परिसरातील अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासाच्या अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी व वित्तहानी झाली नाही, तसेच विमानतळालाही कोणत्याही प्रकारचा धोका झाला नाही. मात्र यात हजारो हेक्टरवरील गवत व झाडे जळून खाक झाले होते.
हेही वाचा - Investigation of Navneet Rana : नवनीत राणांची एमआरआय स्कॅन सह संपूर्ण तपासणी