नाशिक - चांगले शरीर बनवण्याच्या नादात युवकांकडून अति प्रोटीन पावडरचे सेवन ( Excessive consumption of protein powder ) केले जात आहे. यामुळे किडनी, कन्सर सारखे गंभीर आजार होण्याचे ( Protein powder can cause serious diseases ) प्रकार समोर येत आहेत. यावर उपाय म्हणजे प्रोटीन पावडरचे अतिसेवन टाळावे आणि नैसर्गिक आहार घ्यावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
हेही वाचा - Nashik Cyber Crime : चक्क! महापालिका आयुक्तांच्या नावाने फेक अकाऊंट; पोलीस आयुक्तांकडे तक्रार
कोरोना नंतर आरोग्य चांगले राहावे यासाठी सध्या युवकांमध्ये चांगली बॉडी बनवण्याची स्पर्धा सुरू आहे. जिम सुरू केल्यानंतर आपली लवकर चांगली बॉडी (शरीरयष्टी) बनावी यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. अशात काही जण प्रोटीन पावडर, सप्लिमेंटचे सेवन करतात. मात्र याच प्रोटीन पावडरच्या अतिसेवनामुळे काही युवकांना गंभीर आजार झाल्याच्या घटना समोर येत आहेत. नाशिकच्या 25 ते 30 वयोगटांतील दोन युवकांवर प्रोटीन पावडरच्या अतिसेवनामुळे किडनी संबंधित आजार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, प्रोटीन पावडर प्रमाणत घ्यावे किंवा त्याऐवजी प्रोटीनसाठी नैसर्गिक फळभाज्या, कडधान्यांचे सेवन करावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
प्रोटीन पावडर म्हणजे काय ? - प्रोटीन पावडर सप्लिमेंट पावडरच्या प्रकारात असते ज्यात कैसीन, व्हे प्रोटीन असते. प्रोटीन पावडर मध्ये गोडवा येण्यासाठी चिनी आर्टिफिशियल स्वीटनर, विटामिन आणि मिनरल एकत्रित केले जाते. बाजारात प्रोटीन पावडरच्या एक स्कुपमध्ये दहा ते तीस ग्रॅम पर्यंत प्रोटीन असते. ते घेतल्यानंतर शरीराला आवश्यक विटामिन आणि मिनरल्स मिळतात.
प्रोटीन म्हणून काय घ्यावे? - प्रोटीन पावडर बाबत डॉक्टर सांगतात की, कुठली गोष्ट ही प्रमाणात घेतली पाहिजे. जर तुम्ही प्रोटीन पावडर घेत असाल तर याबाबत आधी आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. प्रोटीन पावडरमध्ये कुठले पदार्थ आणि त्याचे प्रमाण किती आहे हे तपासावे व आपल्या शरीराला त्याची किती गरज आहे याची माहिती करून घ्यावी. जर प्रोटीन सप्लिमेंट ऐवजी आहारात अंडी, दही, पालेभाज्या, फळांचे सेवन केल्यास चांगल्या प्रकारे प्रोटीन शरीराला मिळू शकते.
नैसर्गिक आहाराचे सेवन करावे - कोरोनानंतर आरोग्या विषयी जागृती वाढली. त्यामुळे अनेकजण जिममध्ये जाऊ लागले आहेत. अशात लवकर चांगली शरीरयष्टी व्हावी म्हणून अनेक जण प्रोटीन सप्लिमेंटचा अति प्रमाणात वापर करत असल्याचे अनेक उदाहरणांमधून समोर आले आहे. मात्र, यामुळे किडनी संबंधी आजार वाढल्याचे दिसून येत आहे. व्यायाम करणे हे शरीरासाठी, तसेच किडनीसाठी देखील चांगली बाब आहे. मात्र, नैसर्गिक आहाराचे सेवन केले पाहिजे. यात कडधान्य, फळभाज्या, फळे यांचा समावेश असाला तर आपल्याला अतिरिक्त बाहेरील प्रोटीन सप्लिमेंटची गरज भासत नाही, असे किडनी विकार तज्ज्ञ डॉक्टर मोहन पटेल यांनी सांगितले.
प्रोटीन पावडरच्या अति सेवनाने 'हे' आजार होऊ शकतात - प्रोटीन पावडरच्या अतिसेवनामुळे किडनीचे आजार संभवतात. तसेच काही प्रोटीन पावडरमध्ये धातूचे प्रमाण अधिक असल्याने कॅन्सर आजार होण्याची शक्यता असते. प्रोटीन पावडर जास्त प्रमाणात घेतल्याने आपले वजन वाढते, तसेच शरीरात चरबीची मात्रा वाढते, रक्तदाबाच्या समस्या भेडसावतात, हृदय संबंधी आजार होण्याची शक्यता असते.
हेही वाचा - Sexting : धक्कादायक: मोबाईलवरुन 'सेक्सटिंग'च्या प्रमाणात वाढ, अशी ठेवा मुलांवर नजर