नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दरोडेखोरांची टोळी (Robbers in Nashik district) राहुरी तालुक्यात दरोडा टाकण्यासाठी (To Rob Rahuri) आली होती. शहरातील मल्हारवाडी रोड परिसरात शनिवार 4 जून रोजी पहाटे तीनच्या सुमारास टोळीतील ५ दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पाच पैकी दोन जणांना राहुरी पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. फरार तीनपैकी एकाला शिर्डीतून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. एका फरारी दरोडेखोराला अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.
पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये असा घडला थरार (Cinestyle tremor between police and robbers) : राहुरी शहरात गस्तीवरील पोलीस त्या दरोडेखोरांना पकडण्यासाठी पुढे सरसावले असताना दरोडेखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनीही त्यांचा पाठलाग केला, तेवढ्यात दरोडेखोरांनी सत्तूरसारख्या धारदार शस्त्राने पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील व पो. काॅ. मयूर ढगे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. त्यात पोलिस उपनिरीक्षक बोकील व पो. काॅ. ढगे हे जखमी झाले आहेत. दोन दरोडेखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यामध्ये राजू ढगे, ईश्वर अशोक मोरे (दोघे रा. नाशिक) यांचा समावेश आहे. तिघे दरोडेखोर पसार झाले. पसार झालेल्यांपैकी दोघांना शिर्डी येथून ताब्यात घेतले आहे.
दरोडेखोरांवर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद : या आरोपी विरुद्ध नाशिक शहर येथे 10 गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याची नोंद आहे. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील, हे. काॅ. सोमनाथ जायभाय, पो. काॅ. नदिम शेख, पो. काॅ. दादासाहेब रोहकले, पो. काॅ. अजिनाथ पाखरे, पो. काॅ. जालिंदर साखरे, पो. काॅ. महेश शेळके, पो. ना. मेढे आदी सहभागी झाले होते.