नाशिक - रविवारच्या सुट्टीच्या दिवशी त्रंबकेश्वर परिसरातील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या दुगारवाडी धबधबा परिसरात 23 जण अडकले होते. अशात मध्यरात्री पोलिस, महसूल, वन क्लाइंबर अँड रेस्क्यू असोसिएशन व स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बचाव मोहीम राबवण्यात आली. यात 22 तरुणांना वाचवण्यात यश आले. मात्र, यात एक जण वाहून गेला होता. पावसाळ्यात पर्यटन क्षेत्रावर होणारी गर्दी लक्षात घेता नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळावर बंदी घातली आहे.
पर्यटन स्थळांवर बंदी - त्र्यंबकेश्वर भागातील दुगारवाडी धबधबा पदीसरात, एक पर्यटक वाहून गेल्याच्या घटनेनंतर नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी तात्काळ पर्यटन स्थळावर बंदी घालण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत. दुगारवाडी सह त्र्यंबकेश्वर परिसरातील पहिने, इगतपुरी, ब्रह्मगिरी परिसरातील पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे. अनेकवेळा पर्यटन जीवाची परवाना करता धोक्याच्या ठिकाणी जाताना दिसून येतात. त्यामुळे निर्बंध म्हणून जिल्ह्यातील धोकादायक पर्यटन स्थळावर बंदी घालण्यात आली आहे.
रेस्क्यू ऑपरेशनच्या थरार व्हिडिओ आला समोर - दुगारवाडी मध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. एका मोठ्या दगडावर एकमेकांना धरून उभ्या असलेल्या 17 जणांना तब्बल 6 तास मृत्यून अक्षरशः विळखा घातला होता. यावेळी रेस्क्यू टीमने मुसळधार पाऊस आणि अति वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून जीवाची बाजी लावून पर्यटकाना रेस्क्यू केलं. तब्बल सात ते आठ तास मृत्यूच्या दाढेत असलेल्या या पर्यटकांसाठी रेस्क्यू टीम अक्षरशः देवदुत ठरली. रविवारी दुपारी दुगारवाडी धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेले 22 पर्यटक मुसळधार पावसामुळे अचानक पाणी वाढल्याने अडकून पडले होते.
ऑरेंज अलर्ट - हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यातच दुगारवाडीत पर्यटक अडकल्याची व एकाचा मृत्यू झालाची घटना ताजी आहे. अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पुढील 3 दिवस जिल्ह्यातील धबधबे व धोकादायक पर्यटन स्थळावर पर्यटनास बंदी घालण्याचे आदेश तहसीलदार आणि वन विभागाला दिले आहे, असे नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा - Sharad Pawar Attack On BJP: 'भाजप मित्र पक्षाला हळूहळू संपवतात'; पवारांचा भाजपवर हल्लाबोल
हे ही वाचा - ISIS Terrorist Sabauddin Azmi In Azamgarh : इसीसचा दहशववादी आझमगढमध्ये जेरबंद, उत्तरप्रदेश एटीएसने आवळल्या मुसक्या