ETV Bharat / city

जयंत नारळीकर आले असते तर बरे झाले असते - कौतिकराव ठाले पाटील

author img

By

Published : Dec 3, 2021, 9:02 PM IST

यंदा ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्ष जयंत नारळीकर आणि मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो (Father Farancis De Brito) प्रकृतीच्या कारणामुळे अनुपस्थित राहिले.

saihitya sammelan 2021
saihitya sammelan 2021

नाशिक - 'साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवा असतो. राजकीय नेते साहित्यिकांचा मंचावर असू नये हे काय मला पटत नाही. सर्वात जास्त मसाला पुरवणारे हे राजकीय नेतेच असतात. तुम्ही तुमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवा. त्याच्यावर कोणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेल राजकीय नेते चुकत असतील तेव्हा मी मान्य करेन. ईडा पडा टळो लोकशाही बलवान हो. असे म्हणत हे संमेलन आमच्यासाठी खासच आहे,' असेही स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी साहित्य संमेलनात म्हटले आहे.

जाती निर्मूलनाचा विषय साहित्य संमेलनात घेत नाही, म्हणून महात्मा फुले यांनी संमेलनाचे निमंत्रण नाकारले होते. आज त्यांचा लहानसा अनुयायी छगन भुजबळ याच मंचावरून तुमचं स्वागत करतो आहे. नारळीकर,ठाले पाटील आणि भुजबळ एका मंचावर साहित्य सोहळा करत आहेत. हा बदल लक्षात घ्याल की नाही. हा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा आहे. असेही ते म्हणाले.

'नारळीकर आले असते तर बरे झाले असते' - कौतिकराव ठाले-पाटील

3 वर्षांपूर्वी संमेलन अध्यक्ष निवडीसाठी घटना बदलली. डॉ जयंत नारळीकर आले असते तर बरं झालं असतं. उस्मानाबाद साहित्य संमेलनात मणक्याचं दुखणं असतांना फादर फ्रान्सिस दिब्रेटो आले होते. आपल्यासाठी अनेक लोक येणार म्हणून ते आले. मला नारळीकर यांना दोष द्यायचा नाही. मात्र,त्यांची सर्व तयारी करण्याचं ठरवूनही ते आले नाही.यामुळे यंदाच्या साहित्य सम्मेलनाला वेगळी किनार लाभली आहे. आता पुन्हा घटना बदलावी ही आमची इच्छा आहे, असे कौतिकराव ठाले-पाटील म्हणाले.

जात पात विषयावर साहित्य संमेलन जितक वेठीस धरल गेलं तितकं कुठलंच संमेलन वेठीला धरलं गेलं नाही याचा मला खेद वाटतो. आजचा समाज काही बाबतीत सोयीनं वागतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सेलिब्रिटी मौन पाळतात. राजकारणी शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्दयपणे वागतात. म्हणून या प्रश्नावर परिसंवाद घेतलाय. आजकालचे ग्रंथ उदबोधक असतात असे नाही. जात पात आमच्या मनात येत नाही. आमची एकच भाषा म्हणजे साहित्य. नाशिक साहित्य संमेलनात हा प्रश्न उपस्थित झाला याचा मला खेद आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 'माझे जिवीची आवडी' सांस्कृतिक कार्यक्रमातून संमेलनाचा शुभारंभ'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.