ETV Bharat / city

12 Ft long Kite in Yeola : येवल्यातील धडपड मंचाचे भव्य पतंग ठरतायेत लक्षवेधी - येवल्यात डिजीटल पतंग

धडपड मंचाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही भव्य 12 फुटी पतंग (12 Ft long Kite in Yeola) शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात आला आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी मेनरोडला हे पतंग लावण्यात आले आहे. हे आकर्षक भव्य पतंग शहरात महत्वाचे आकर्षण ठरत आहे.

Dhadpad mANCH
Dhadpad mANCH
author img

By

Published : Jan 6, 2022, 10:11 AM IST

येवला (नाशिक) :- पतंगवेडे शहर समजल्या जाणाऱ्या येवल्यात भोगी, संक्रांत (Makarsankrant) व कर अशा तीनही दिवस रंगणाऱ्या पतंगोत्सवाची लगबग सुरु आहे. हा उत्सव बच्चे-कंपनीबरोबर आबालवृद्ध आणि सर्वच कुटुंबीय उत्साहाने साजरा करतात. त्याच उद्देशाने येथील धडपड मंचाचे वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी भव्य 12 फुटी पतंग (12 Ft long Kite in Yeola) शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात आला आहे.

येवल्यात 13 फुटी पतंग
सर्वात मोठा पतंग
सर्वदूर ओळख असलेल्या व भोगी, संक्रांत व कर अशा तीनही दिवस रंगणाऱ्या येवला शहरातील पतंगोत्सवाची तयारी सुरु आहे. बच्चे कंपनी, तरुणाईसह अबालवृद्ध पतंगोत्सवात पतंग उडविण्याचा आनंद घेतात. तीन दिवस चालणारा पतंगोत्सव बघण्यासाठी बाहेरगावहून नागरिक येतात. अशा ह्या संक्रांत सणासाठी शहरात लगबग सुरु झाली आहे. ह्या पारंपारीक सणाची आठवण रहावी व सणाचे एक मंगलमय वातावरण टिकून राहण्यासाठी येवल्यातील सेवाभावी संस्था धडपड मंच कायमच प्रयत्नशील असते. धडपड मंचचे प्रभाकर झळके यांनी सुंदर असा एक बारा फूट उंचीचा व एक आठ फूट उंचीचा असे दोन मोठे डिजीटल पतंग बनविले असून त्यास आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. शहरातील मध्यावर्ती ठिकाण असलेले मेनरोडला हे पतंग लावण्यात आले आहे. हे आकर्षक भव्य पतंग येणार्‍या जाणार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.