ETV Bharat / city

Darshan of Saptashrungi Mata : 'या' तारखेपासून सप्तशृंगी मातेचे भाविकांना घेता येणार दर्शन... - darshan of Saptashrungi Mata in Navratra

सप्तशृंगी निवासिनी ( Saptashrungi Mata of Wani ) तसेच लाखो भाविकांची श्रद्धा असलेल्या सप्तशृंगी देवीचे नवरूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार ( darshan of Saptashrungi Mata ) आहे. नवरात्रोत्सवात पहिल्या माळेपासून म्हणजे 26 सप्टेंबरपासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली ( darshan of Saptashrungi Mata from 26 September ) आहे.

Sapthasringi Devi
सप्तशृंगी देवी
author img

By

Published : Sep 15, 2022, 9:37 AM IST

नाशिक - सप्तशृंगी निवासिनी ( Saptashrungi Mata of Wani ) तसेच लाखो भाविकांची श्रद्धा असलेल्या सप्तशृंगी देवीचे नवरूप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार ( darshan of Saptashrungi Mata ) आहे. नवरात्रोत्सवात पहिल्या माळेपासून म्हणजे 26 सप्टेंबरपासून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.

सप्तशृंगी मातेच्या सव्वा फूट मूर्तीवर वर्षानुवर्ष असलेल्या शेंदूर, लाख, मेण आदी तब्बल 1100 किलो काढल्यानंतर मूळ स्वरुप समोर आलं. हे मूळ स्वरुप इतकं विलोभनीय की मूर्ती एका दृष्टीक्षेपात डोळ्यात साठवणं केवळ अशक्य आहे. आता आदिशक्तीच मूळ स्वरुप बघण्यासाठी भाविकांचे डोळे आतुर झाले असून ही प्रतीक्षा आता संपणार आहे. नवरात्रोत्सवात पहिल्या माळेपासून म्हणजे 26 सप्टेंबर पासून मंदिर भाविकांसाठी खुले होणार ( darshan of Saptashrungi Mata from 26 September ) आहे. नवरात्री उत्सव काळात होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना सप्तशृंगी मातेचा व्यवस्थित दर्शन घेता यावं, यासाठी जिल्हा प्रशासन आणि मंदिर प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात आले आहे

या दिल्यात सूचना- नवरात्रोत्सव काळात खाजगी वाहनांना सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी बंदी घालण्यात येणार आहे. तसेच या काळात नांदुरी ते सप्तशृंगी गड वाहतुकीसाठी सुस्थितीत असलेल्या व शक्यतो नव्या बसेसचाच वापर करावा,पायवाटेवर आरोग्य सुविधा असणार आहे. ठिकठिकाणी मोबाइल टॉयलेट उभारणे, घाट रस्त्यावरील खड्डे बांधकाम विभागाने त्वरित बुजवावे, दोन अतिरिक्त रुग्णवाहिका यात्रा काळात गडावर उपलब्ध करून द्याव्यात, ठिकठिकाणी आवश्यक मेडिकल चेकअप कॅम्प सुरू करावेत, भाविकांना ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी पुरवावे, फर्निक्युलर ट्रॉली व पायरी वाटेने येणाऱ्या भाविकांमध्ये योग्य प्रमाणात समन्वय साधत पोलिस व ट्रस्ट प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने दर्शन सुलभ करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, तसेच भाविकांसाठी यात्रा सुरू होण्याआधी हेल्पलाइन नंबर कार्यान्वित करावा आदी सूचना प्रशासनाने दिल्या ( darshan of Saptashrungi Mata in Navratra ) आहेत .

सप्तशृंगी देवीचे महात्म्य - ब्रह्मदेवांच्या वरदानामुळे क्रूरकर्मा झालेल्या महिषासुराचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांसह अन्य सर्व देवतांनी आदिशक्तीचे आवाहन केले. आदिमायेच्या विविध शक्तीरुपांनी तब्बल नऊ दिवस महिषासुरासह अनेक असुरांशी युद्ध केले आणि प्रचंड युद्धानंतर देवीने महिषासुराचा वध केला. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणून साजरी केली जाऊ लागली. नवरात्र म्हणजे देवीच्या शक्ती स्वरुपांचे पूजन, उपासना, आराधना, नामस्मरण करण्याचा प्रेरणादायक कालावधी. साडेतीन शक्तीपीठांपैकी सप्तशृंगी पर्वतरांगांवर देवीने महिषासुराचा वध केल्याचे सांगितले जाते. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले, अशी मान्यता आहे. ( devotees will get darshan of Saptashrungi Mata )

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.