ETV Bharat / city

Ajit Pawar : भान ठेवा, उचकवण्याचं काम करू नका : अजितदादांनी टोचले राणांचे कान - Navneet Rana Ravi Rana Agitation

राणा दाम्पत्याचे ( Navneet Rana Ravi Rana Agitation ) मातोश्रीवरील हनुमान चालीसा प्रकरणी ( Hanuman Chalisa At Matoshree ) उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) यांनी राणांचे चांगलेच कान टोचले आहेत. प्रत्येकाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचे भान ठेवावे. उचकवण्याचे काम करू नये, असे ते ( Ajit Pawar Criticized Rana Couple ) म्हणाले

Ajit Pawar
अजित पवार
author img

By

Published : Apr 24, 2022, 5:09 PM IST

नाशिक : आम्ही बहुतेक जण काल कोल्हापूरला होतो. पण आमचे मुख्यमंत्री व गृहमंत्री मुंबईत होते. मुंबईमध्ये एक खासदार आणि एक आमदार यांनी मातोश्रीला येऊन हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa At Matoshree ) म्हणण्याचा निर्णय ( Navneet Rana Ravi Rana Agitation ) घेतला. कोणी कुठे काय म्हणावं हा ज्याचा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे. याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. पण त्याच्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे, हे भान ठेवायला हवे होते. कोणीच कोणाला उचकवण्याचे काम करु नये, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) यांनी कालच्या प्रकरणावर राणांचे कान ( Ajit Pawar Criticized Rana Couple ) टोचले.

आंदोलन झाली ती चुकीची झाली : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ही चांगली आहे. परंतु कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे, हे चुकीचे आहे. शेवटी कोणत्याही पक्षाचे नेतृत्व ते कार्यकर्त्यांसाठी दैवत असते. त्यामुळे त्या नेतृत्वाच्या बाबतीत बोलणे आणि त्यांच्या घरासमोर आंदोलने करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. त्यामुळे आंदोलन झाली ती चुकीची झाली. महाराष्ट्राची संस्कृती परंपरा ही प्रत्येकाने जपली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी सर्वांना केले. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला त्यांचे नेतृत्व हे महत्त्वाचे असते आणि त्यातल्या त्यात मातोश्री हे शिवसैनिकांचे अनेक वर्षापासून श्रद्धास्थान आहे. त्यामुळे त्याठिकाणी जाऊन असे आंदोलन करणे हे चुकीचे होते. समजून सांगितल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी हे समजून घेणे आवश्यक होते. परंतु ते समजून न घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. याबाबत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांचं काम हे तपास करण्याचं आहे आणि पोलिस तपास करून पुढील कारवाई करतील.

अजित पवार

सुडाचे राजकारण आम्ही करत नाही : सरकार बदलल्यानंतर कोणत्याही विरोधी पक्षाला असं वाटत की, सरकारच्या सांगण्यावरून पोलीस दल काम करते. परंतु आम्ही कोणाला काही सांगितले नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो आणि सत्तेतही आहोत. पण आम्ही कधीही सुडाचे राजकारण केले नाही. आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेस आम्हाला असं वाटत होतं की, पोलीस हे सरकारच्या सांगण्यावरून काम करतात. परंतु ते तसे नसते हा गैरसमज दूर करावा.

पोलिसांनी त्यांना सांगितलं येऊ नका, पण ते आले : अनेकदा आम्हाला पण सांगितलं जातं की इकडे जाऊ नका वातावरण तंग आहे, तेव्हा आम्ही ऐकतो. पोलिसांनी त्यांना सांगितलं येऊ नका, पण ते आले. त्यांच्या खारच्या फ्लॅटवर ते थांबले. त्यामुळे जे व्हायला नको, ते झालं व वातावरण वाढलं. तरी पोलिसांनी त्यांना समजावून सांगितलं. गृहमंत्री या प्रकरणावर लक्ष ठेवून होते. काही लोकांच्या भावना तीव्र झाल्या. मातोश्रीच्याबद्दल आजच नाही, बाळासाहेब असल्यापासून शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहे. त्यांचं दैवत म्हणून त्यांच्याकडे बघतात. राष्ट्रवादीच्या लोकांची पवार साहेबांबद्दल, काँग्रेसच्या लोकांची सोनियाजींबद्दल, भाजपच्या लोकांची मोदींबद्दल हीच भावना आहे. पण जे घडले ते घडायला नको होते. पोलीस पोलिसांचे काम व्यवस्थित करतील. सीसीटीव्ही कॅमेरे मीडियाचे कॅमेरे होते.

राष्ट्रपती राजवटीबाबत त्यांचा प्रश्न : प्रत्येकाने थोडं तारतम्य ठेवून वागावं. सगळीकडे शांतताच राहीली पाहिजे. राज्य उत्तम पद्धतीने पुढे जावं हा आमचा कायम प्रयत्न असतो. तशी पवार साहेबांची आम्हाला शिकवण आहे. तपास यंत्रणा म्हणून पोलिसांच काम त्यांचं ते करतील. कायदा हातात घेण्याचं काम कोणीच करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच राष्ट्रपती राजवटीबाबत विचारले असता, राष्ट्रपती राजवटीबाबत त्यांनी काय मागणी करावी हा त्यांचा प्रश्न असे ते म्हणाले.

हेही वाचा : Dilip Walse Patil : राज्यात राष्ट्रपती राजवटीसाठी प्रयत्न होत आहेत - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.