मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिची सुट्टी एन्जॉय करत आहे. ती वेळोवेळी तिच्या सुंदर व्हेकेशनची झलक शेअर चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आज,17 डिसेंबर रोजी मलायकानं एक सुंदर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती शाहरुख खानच्या 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे'चा लोकप्रिय सीन रिक्रिएट करताना दिसत आहे. हा व्हिडिओ बनविण्यासाठी तिच्या टीमनं देखील तिची मदत केली आहे. या व्हिडिओमध्ये मलायका अरोरानं शाहरुख खानची भूमिका साकारली होती, तर त्याच्या टीमनं काजोलची व्यक्तिरेखा केली आहे. आता मलायकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झाला आहे.
मलायका अरोरानं शेअर केला व्हिडिओ : मलायकानं व्हिडिओ ट्रेनच्या एका प्लॅटफॉर्मवर उभी असताना बनवला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना मलायकानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझ्या आत असलेल्या शाहरुखला बाहेर आणलं आहे, पण यावेळी ट्रेनच्या वरती 'छैया-छैया' ऐवजी माझा हात पकडून ट्रेनमध्ये चढा असा आहे. 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे'ची जादू निर्माण केली आहे. एकदा पुन्हा एका ड्रैमॅटिक अंदाजमध्ये हात पकडला गेला आहे. माझ्या टीमनं स्वत:च्या जीवाची पर्वा न करता हात पकडला. माझा ट्रेनचा प्रवास पार्ट 2.' मलायकानं हा व्हिडिओ रेल्वे मंत्रालयलाही टॅग केला आहे. याशिवाय यापूर्वी मलायकानं शाहरुख खानबरोबर 'छैया-छैय्या' गाण्यासाठी काम केलं होतं. यात तिनं ट्रेनच्या वरती डान्स केला होता. दरम्यान तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेक चाहते आपल्या प्रक्रिया देत आहेत.
मलायका अरोरावर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव : या व्हिडिओनंतर अनेक चाहत्यांनी मलायकाला 'छैय्या-छैय्या'चा सीन रिक्रिएट करण्याची विनंती केली आहे. याशिवाय काहीजणांनी या व्हिडिओवर हसणारे आणि फायर इमोजी शेअर केले आहेत. अलीकडेच मलायकानं मुलगा अरहानबरोबर एक रेस्टॉरंट उघडले आहे. दरम्यान 16 डिसेंबर रोजी अभिनेत्री करीना कपूर, करिश्मा कपूर हे मलायकाबरोबर दिसल्या होत्या. यावेळी मलायकानं सुंदर कॅज्युअल ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती खूप देखणी दिसत होती.
हेही वाचा :
- मलायका अरोराच्या क्रिप्टिक पोस्टनंतर, अर्जुन कपूरनं स्वत:ला सिंगल म्हणून ब्रेकअपची केली पुष्टी
- मलायका अरोराच्या वडिलांच्या प्रार्थनासभेत अरबाज खानसह स्टार्सनं वाहिली श्रद्धांजली - Arbaaz Khan Attends Prayer Meet
- वडिलांच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी मलायका अरोराच्या आईचा नोंदवला जबाब, चौकशी सुरू - Malaika Arora Father Suicide Case