ETV Bharat / state

भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळण्याची चूक अजित पवारांनी कशी केली? - MAHARASHTRA CABINET EXPANSION

आता मंत्रिमंडळातील भुजबळांचा पत्ता कट करण्यात आल्याने भुजबळ प्रचंड नाराज झाले असून, त्यांच्या नाराजीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपालाही बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Ajit Pawar and Chhagan Bhujbal
अजित पवार आणि छगन भुजबळ (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 17, 2024, 2:06 PM IST

मुंबई - 15 व्या विधानसभेचे वरिष्ठ सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अजित पवारांनी मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलीय. राज्यात मराठा आंदोलनाची धग चहूबाजूंनी पसरत असताना आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने निशाणा साधत असताना मनोज जरांगे पाटलांशी दोन हात करण्याची हिंमत छगन भुजबळांनी दाखवली होती. अशा प्रसंगी भाजपानेही भुजबळांना साथ दिली होती. परंतु आता मंत्रिमंडळातील भुजबळांचा पत्ता कट करण्यात आल्याने भुजबळ प्रचंड नाराज झाले असून, त्यांच्या नाराजीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपालाही बसण्याची शक्यता वर्तवली जातेय.

भाजपाचा डीएनए ओबीसी : राज्यातील ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा म्हणून ओळख असलेल्या छगन भुजबळ यांनी 80 च्या दशकापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाची पदे भूषविलेली आहेत. अशा या महत्त्वाच्या नेत्याला मंत्रिमंडळातून वगळण्याचे धारिष्ट्य अजित पवार यांनी कसे दाखवले? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. वास्तविक छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली असून, ते आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. अशा परिस्थितीत भाजपासाठीसुद्धा छगन भुजबळांची नाराजी त्रासदायक ठरू शकते. भाजपाचा डीएनए ओबीसी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वीच स्पष्ट केलेलं असताना ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा असलेले छगन भुजबळ यांची नाराजी येत्या काळात भाजपासाठी घातक ठरल्यास त्याचा फटका त्यांना येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू शकतो.

मुख्यमंत्र्यांनी कुठेही हस्तक्षेप केलेला नाही : छगन भुजबळ यांनी मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावेळी प्रखर भूमिका घेतली. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढवत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले असताना एकटे छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी दोन हात करण्यासाठी मैदानात उतरले. आणि शेवटपर्यंत त्यांनी त्यांची भूमिका जोमाने रेटून धरली. आताही मंत्रिमंडळातून पत्ता कापल्यानंतर याबाबत मुख्यमंत्र्यांनी कुठेही हस्तक्षेप केला नसल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय. यावरून भुजबळांचा पत्ता कापण्यात भाजपाचा किंवा मुख्यमंत्र्यांचा कुठलाही हात नसल्याचं स्पष्ट होतंय. तर याचाच दुसरा अर्थ यासाठी सर्वस्वी अजित पवार हेच जबाबदार असल्याचंही स्पष्ट होतंय.

भुजबळांना दूर का ठेवले? : एकीकडे भुजबळ नाराज असताना दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा मैदानात उतरण्याचा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटलांनी घेतलाय. अशा परिस्थितीत भुजबळांची नाराजी भाजपासाठीसुद्धा घातक ठरू शकते. छगन भुजबळ यांच्याबाबत अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयावर बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले आहेत की, छगन भुजबळ हे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते असून, राज्यातीलच नव्हे तर देशाच्या राजकारणातील त्यांची कारकीर्द आतापर्यंत महत्त्वाची ठरलीय. छगन भुजबळांनी अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाला छेद देणारी भूमिकासुद्धा घेतली आणि हे करताना त्यांनी अजित पवार यांनाही जुमानले नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनावेळी छगन भुजबळ यांनी पक्षाला सोडून स्वत:ची स्वतंत्र भूमिका घेतली. मनोज जरांगे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणीही चकार शब्द काढत नसताना भुजबळांनी मात्र जरांगेंवर टीकेचे बाण सोडणे सुरूच ठेवलेत. याकरिता भुजबळ कुठेतरी पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेत आहेत आणि हे येणाऱ्या काळात पक्षासाठी अडचणीचे ठरू शकते, असं अजित पवारांना वाटत असल्याने छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला असावा, असेही माईणकर म्हणालेत.

भुजबळांची नाराजी रास्त : भुजबळ यांच्या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड म्हणालेत की, भुजबळांची नाराजी रास्त आहे. एखाद्या कार्यकर्त्याला वापरून फेकून देणे हे बरोबर नाही. भुजबळ हे पवार साहेबांकडे आल्यापासून पवार साहेबांनी त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. मंडल आयोग, 1990 पासून याच नागपूरमधून ते बाहेर पडले होते. भुजबळांच्या जीवाला धोका असताना पवार साहेब त्यांच्याबरोबर कसे वागले. त्यांच्या बंगल्यावर हल्ला झाल्यानंतर पवार साहेब त्यांच्या घरी गेले. ते पहिल्यांदा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. नंतर राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. ज्यांनी भुजबळांचा हा प्रवास बघितला आहे, ते कधी विसरू शकत नाही. आता त्यांनी कुठे जावं? काय करावं? हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु एका लढवय्या कार्यकर्त्याची राजकीय कारकीर्द कापण्याची जी पद्धत आहे ती फार चुकीची आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

हेही वाचा :

  1. जरांगे पाटलांचं नव्या सरकारला आवाहन; 'सामूहिक आमरण उपोषणा'च्या तारखेची उद्या करणार घोषणा
  2. देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मनोज जरांगे पाटलांचा अडथळा?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.