नाशिक - आजच्या स्थितीत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर फसवणूकीचे प्रकार समोर येतात. यामधून कित्येकांना पैशांच्या व्यवहारात मोठा फटका बसलेला आहे. असाच प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. (Facebook friend cheated girl) फेसबुक फ्रेंडने दहा लाख मागितले. दरम्यान, अश्लील चित्रफीती आणि छायाचित्रे व्हायरल करत अल्पवयीन मुलीला धमकावण्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये दोन संशयितांना नाशिक (Facebook friend cheated girl In Nashik) पोलिसांनी बिहार राज्यातील बक्सार जिल्ह्यातून अटक केली आहे. नाशिकच्या उपनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
मुलीने पैसे देण्यास नकार दिला
एका संशयिताने महिलेच्या नावे एक बनावट फेसबुक खाते तयार केले. नाशिकरोड परिसरातील मुलीवर पाळत ठेवली. तिला नोकरी देण्याचे आमिष दाखवले. तसेच, वडील मयत झाल्याचे सांगत भावनिक गोष्टी करत जवळीक साधली. दरम्यान, मुलीने मैत्री करण्यास नकार दिला. तसेच, या मुलीला वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन करून त्रास देण्यास सुरुवात केली. यानंतर या मुलीचे फोटो एडीट करून सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत दहा हजार रुपयांची मागणी या संशयिताने केली. यावेळीही या मुलीने पैसे देण्यास नकार दिला. यानंतर दहा हजार ऐवजी दहा लाखांची मागणी या संशयिताने केली. हे झाल्यानंतर मुलीला व्हिडीओ कॉल करून अश्लील फोटो या संशयिताने काढून घेतले. यानंतर हे फोटो तिच्या फेसबुकच्या खात्यावर अपलोडदेखील करत बदनामी केली.
बक्सार बिहार या दोघांना बिहारमध्ये जाऊन बेड्या ठोकण्यात आल्या
हा प्रकार या मुलीने घरी सांगितल्यानंतर तिच्या मोठ्या भावाने पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, अजिनाथ बतुळे, सुनील लोहरे, मुकेश क्षीरसागर, अनिल शिंदे यांच्या पथकाने तपास करत या संशयितांचे फेसबुक खाते, त्यावरील मोबाईल क्रमांक ट्रेस करून लोकेशन शोधले. यानंतर अविकस अजय कुमार मिश्रा उर्फ बिकास शाहू सिलौत, बनारसी गणेश दुबे, बक्सार बिहार या दोघांना त्यांच्याकडून तीन मोबाईल, एक जिओ वाय फाय डोंगल ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - Welcome New Year 2022 : अंधत्व असतानाही चितारले हे अनोखे चित्र अन् केले नव्या वर्षाचे स्वागत