ETV Bharat / city

नाशिकमध्ये पाच हजार रेमडेसिवीरची मागणी; केवळ 200 इंजेक्शन प्रशासनाला उपलब्ध - नाशिक रेमडेसिवीर इंजेक्शन

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. रोज 5 ते 6 हजार कोरोनाबाधित आढळून येत असून 50 हुन अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशात शहर आणि ग्रामीण भागातील सरकारी, खासगी हॉस्पिटल बरोबर सर्वच कोविड सेंटरचे बेड फुल झाले असून रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळत नाही. तर दुसरीकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. जवळपास 6 ते 7 हजार रुग्णांना रेमडेसिवीरची गरज असून 5000 हजारच्या तुलनेत फक्त 200 रेमडेसिवीर उपलब्ध झाले असुन उर्वरित 19 हजार 800 रेमडेसिवीर टप्याटप्याने मिळतील, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले.

remdesivir injections
रेमडेसिवीर
author img

By

Published : Apr 25, 2021, 9:38 AM IST

नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून ऑक्सिजन तुटवड्या बरोबरच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडे हॉस्पिटलने रुग्णांसाठी 5 हजार रेमडेसिवीरची मागणी केली असतांना प्रशासनाला केवळ 200 रेमडेसिवीर मिळाले असल्याने, जिल्हा प्रशासन हतबल झाले असून दुसरीकडे रुग्णाच्या नातेवाईकांना रेमडेसिवीरसाठी धावपळ करावी लागत आहे. रेमडेसिवीर उत्पादक कंपनीकडून पुढील काही दिवसात टप्याटप्याने 20 हजार रेमडेसिवीर मिळतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. रोज 5 ते 6 हजार कोरोनाबाधित आढळून येत असून 50 हुन अधिक रुग्णांचा मृत्यू होत आहे. अशात शहर आणि ग्रामीण भागातील सरकारी, खासगी हॉस्पिटल बरोबर सर्वच कोविड सेंटरचे बेड फुल झाले असून रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड मिळत नाही. तर दुसरीकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. जवळपास 6 ते 7 हजार रुग्णांना रेमडेसिवीरची गरज असून 5000 हजारच्या तुलनेत फक्त 200 रेमडेसिवीर उपलब्ध झाले असुन उर्वरित 19 हजार 800 रेमडेसिवीर टप्याटप्याने मिळतील, असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. रेमडेसिवीर मिळवण्यासाठी नातेवाइकांची धावपळ होत असून जिल्हाधिकारी कार्यालयात रुग्णांचे नातेवाईक गर्दी करत असल्याने याठिकाणी अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नाशिकमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठ्याचा आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा..

रेमडेसिवीरचा काळा बाजार -

कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमडेसिवीरचा तुटवडा आल्याने अनेक ठिकाणी इंजेक्शनचा काळा बाजार होत आहे. नातेवाईकही आपल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी 1200 रुग्णांना मिळणाऱ्या रेमडेसिवीरसाठी 20 ते 25 हजार रुपये मोजत असल्याचे चित्र आहे.

20 हजार रेमेडिसिव्हर उपलब्ध होणार -
नाशिक जिल्ह्यासाठी 20 हजार रेमडेसिवीरचा कोटा उपलब्ध होणार असून त्याचे योग्य वितरण व्हावे, यासाठी तहसिलदारांना जबाबदारी सोपवली आहे. तसेच नाशिक शहरासह ग्रामीण भागातील हॉस्पिटलमध्ये रुग्णांना रेमडेसिवीरचे कसे वितरण होईल, याची काळजी घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितलं. डॉक्टरांनीसुद्धा गरज असलेल्या रुग्णांसाठी रेमडेसिवीरची मागणी करावी, जेणेकरून गरज असलेल्या रुग्णांपर्यंत इंजेक्शनचा पुरवठा होण्यास मदत होईल, असेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

आठ दिवसापासून रेमडेसिवीर मिळवण्याचा प्रयत्न करतोय -

आमचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये असून आम्ही मागील आठ दिवसांपासून रेमडेसिवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी धावपळ करत आहोत. मात्र आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आलो आहोत. याठिकाणीसुद्धा आमची निराशा झाली आहे. काही ठिकाणी काळ्या बाजारात रेमडेसिवीरसाठी 25 ते 30 हजार रुपयांची मागणी होत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आम्हाला लवकरात लवकर रेमडेसिवीर उपलब्ध करून घ्यावे, अशी विनंती रुग्णांचे नातेवाईक करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.