नाशिक (येवला) - गेली दोन वर्ष कोरोना परिस्थिती आहे. या काळात कोणताच बाजार सुरळीत चालु नव्हता. त्यातच सर्वत्र लॉकडाउची परिस्थिती असल्यामुळे छोट्या मोठ्या बाजारपेठाही चालू नव्हत्या. त्यातच सततचे बदलते हवामान. या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी कांद्याची साठवून करून ठेवली. मात्र, वातावरण बदलामुळे कांदा आजच्या स्थितीत मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. तो ना मार्केटमध्ये घेऊन जाता आला ना छोट्या मोठ्या बाजारात विकता आला. हा सर्व कांदा खराब झाल्याने उकिरड्यावर फेकू द्यावा लागला आहे. त्यामुळे शेतकरी होता नव्हता तो पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
येवला तालुक्यातील पारेगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी वैभव खिल्लारे यांनी कांद्याला भाव मिळेल या आशेने कांदा चाळीत साठवून ठेवला होता. मात्र, बदलत्या हवामानामुळे कांदा खराब झाल्याने अक्षरशः कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. शेतकऱ्याने यावेळी खरिपामध्ये कांद्याचे लागवड केली होती. मात्र, सततच्या बद्दल बदलते वातावरण कधी अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टर कांद्याला फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील 280 कोटीच्या कांद्याला पावसामुळे फटका बसला असून खरिपाच्या 8 हजार हेक्टरला या पावसामुळे फटका बसला आहे. त्यामध्ये रोपांच्या नुकसानीमुळे दहा हजार हेक्टरलाही मोटा तोटा झालेला आहे.
राजस्थानात कांदा चांगला पिकतो
देशात सुमारे २२५ लाख टन कांद्याचे उत्पादन होते. तर, २० ते ३० लाख टनांपर्यंत कांद्याची निर्यात होते. यामध्ये २० ते २५ लाख टन कांदा खराब होतो. आता नाशिक, नगर, पुणे सोलापूर या जिल्ह्यबरोबर विदर्भ, मराठवाडा व खान्देशात कांदा लागवड वाढू लागली आहे. पण आता देशात कांद्याखालील क्षेत्र वाढू लागले आहे. कर्नाटक राज्यात दहा जिल्ह्यत कांदा लागवड होते. तेथे सुपीक लाल माती असल्याने एकरी उत्पादन अधिक येते. मध्यप्रदेशातील सुपीक जमीन व चांगले हवामान यामुळे तेथेही उत्पादकता वाढू लागली आहे. राजस्थानात कांदा चांगला पिकतो. राज्यातील कांद्याला स्पर्धा वाढू लागली आहे.
उत्पादन खर्च वाढल्याने एका दुष्टचक्रात कांदा पीक सापडले
दिवसेंदिवस उत्पादन वाढणार हे नक्की आहे. कांदा निर्यातीला संधी आहे. पण तेथेही चीन व पाकिस्तानच्या कांद्याबरोबर स्पर्धा करावी लागते. स्थानिक बाजारपेठेत तीस रुपये किलोच्यावर दर गेले तर निर्यात थांबते. सध्या त्याचा अनुभव येत आहे. पूर्वी १५ ते २० रुपये किलो कांदा गेला तरी शेतकऱ्यांना परवडत होते. पण आता हा दर परवडत नाही. उत्पादन खर्च वाढल्याने एका दुष्टचक्रात कांदा पीक सापडले आहे. त्यामध्येच वातारण बदलामुळे हे असे कांदा फेकून देण्याचे संकट येत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत येत आहे.
हेही वाचा - येवल्यात 70 वर्षांनंतर अमावस्येच्या दिवशी कांद्याचे लिलाव