ETV Bharat / city

काश्मीर ते कन्याकुमारी 8 दिवसांत पूर्ण ; नाशिकच्या सायकलिस्टची कामगिरी

author img

By

Published : Nov 24, 2020, 5:49 PM IST

Updated : Nov 24, 2020, 7:34 PM IST

सायकलिस्ट ओम महाजन याने कौतुकास्पद कामगिरी करत नाशिकच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी 3800 किलोमीटरचा प्रवास 8 दिवसात पूर्ण करत त्याने सायकलिंगमध्ये विक्रम नोंदवलाय. लवकरच याची 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

nashik cyclist news
काश्मीर ते कन्याकुमारी 8 दिवसांत पूर्ण ; नाशिकच्या सायकलिस्टची कामगिरी

नाशिक - सायकलिस्ट ओम महाजन याने कौतुकास्पद कामगिरी करत नाशिकच्या शिरपेचात मनाचा तुरा खोचला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी 3800 किलोमीटरचा प्रवास 8 दिवसात पूर्ण करत त्याने सायकलिंगमध्ये विक्रम नोंदवलाय. लवकरच याची 'गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या नाशिकच्या हितेंद्र महाजन व महेंद्र महाजन यांच्या पावलावर पाऊल ठेवत ओम महाजन याने सायकलिंगमध्ये अनोखा विक्रम केला. त्याने फक्त आठ दिवस 7 तास व 38 मिनटांत काश्मीर ते कन्याकुमारीचा तब्बल 3 हजार 800 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. थंडी, वारा, पाऊस, वाहतूक अशा परिस्थितीत यंगेस्ट सायकलिस्ट ओम महाजनने कन्याकुमारीला पोहोचत ही मोहीम फत्ते केली आहे. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजून 22 वाजता लाल चौक श्रीनगर येथून त्याने सायकलींगला सुरुवात केली. अवघ्या 17 व्या वर्षी त्याने श्रीनगर-दिल्ली-झाशी-नागपूर-हैदराबाद-बंगळूर-मदुराई-कन्याकुमारी असा प्रवास तब्बल 3900 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे.

महाजन कुटुंबाच्या नावे पुन्हा विक्रम

2018 मध्ये डॉ.महेंद्र महाजन यांनी 10 दिवस 9 तासात काश्मीर ते कन्याकुमारी अंतर पूर्ण केले होते. मात्र कर्नल भरत पन्नू यांनी 8 दिवस 9 तास 50 मिनिटात हे अंतर पूर्ण करत महेंद्र महाजन यांचा रेकॉर्ड मोडला. ओम याने हेच अंतर 8 दिवस 7 तास 38 मिनिटात पूर्ण करून नवीन रेकॉर्ड सेट केला आहे.

Last Updated : Nov 24, 2020, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.