नाशिक - संध्याकाळी सात वाजता दुकान बंद झाल्यानंतर देखील शहरातील वाईन शॉप मध्ये मोठ्या प्रमाणावर तळीरामांनी गर्दी होती तसेच ही सर्व दुकाने शनिवार-रविवार बंद राहणार असल्याने या गर्दीमध्ये अधिकच वाढ झाली आहे..
शनिवारी-रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा बंद..
नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने यावर कठोर उपाययोजना करत तातडीने बुधवार दि.10 मार्च पासून दररोज संध्याकाळी सात वाजता दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच शनिवार आणि रविवारी कोरोना साखळी तोडण्यासाठी शहरातील महत्त्वाच्या बाजारपेठा तसेच इतर सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे स्वागत नाशिकमधील विविध व्यापारी संघटनांनी केले आहे. त्यामुळे आता उद्या शनिवारपासून दर शनिवार आणि रविवारी महामारीचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा बंद राहणार आहेत.