ETV Bharat / city

Sri Kshetra Trimbakeshwar : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची अलोट गर्दी; चला तर मग आपणही घेऊया दर्शन... - Sri Kshetra Trimbakeshwar Temple

आज श्रावण महिन्यातील पहीला श्रावण (Shravan) साेमवार. हिंदु धर्मात श्रावण महिना व सोमवारला महत्वाचे स्थान आहे. त्यामुळे नाशिक येथे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या 'श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराला' (Sri Kshetra Trimbakeshwar) आजच्या दिवशी विशेष महत्व प्राप्त होते. अख्ख्या भारतातुन आज भाविक येथे दर्शनासाठी (Crowd of devotees at Sri Kshetra Trimbakeshwar) येतात. श्रावणी सोमवारला दिवसभर सुरु असलेल्या पूजा-अर्चेमुळे मंदिरातील वातावरण भक्ती सागरात वाहुन निघते.

Sri Kshetra Trimbakeshwar
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर
author img

By

Published : Aug 1, 2022, 1:10 PM IST

Updated : Aug 1, 2022, 3:24 PM IST

नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या 'श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात' (Sri Kshetra Trimbakeshwar) आज 'श्रावण (Shravan) सोमवारच्या' पहील्या सोमवारी भाविकांची वर्देळ (Crowd of devotees at Sri Kshetra Trimbakeshwar) दिसुन आली. आज पहाटेपासूनच महाभिषेक, श्रावणी अभिषेक, आरती अशा पूजाअर्चा सुरू असल्याने; मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून निघाला आहे.

श्रावण सोमवार बाबत प्रतिक्रीया देतांना श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरातील महंत

पहिला श्रावणी सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात, आज पहाटे पासून भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा दिसुन आल्या. नाशिकसह राज्यभरातून भाविक त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झालेत. मंदिराच्या पूर्व दरवाज्याकडील मंडपात एकाच वेळी दहा ते पंधरा हजार भाविक उभे राहू शकतात, अशी व्यवस्था करण्यात आली. मात्र तो मंडपही कमी पडल्याने, भाविकांच्या रांगा मंदिराच्या बाहेर पर्यंत लागल्या होत्या. भाविकांना दर्शनासाठी चार ते पाच तासांचा वेळ लागत आहे. तर पेड दर्शनासाठी, दोनशे रुपये देणाऱ्या भाविकांना देखील दर्शनासाठी दीड ते दोन तासाचा वेळ लागत आहे.

कडक सुरक्षा व्यवस्था : मागील दोन वर्षे कोरोना मुळे, त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना अनेक निर्बंध होते. मात्र आता परिस्थिती पूर्वत झाल्याने पुन्हा त्र्यंबकेश्वर नगरी भाविकांनी दुमदुमून गेली आहे. हजारोच्या संख्येने भाविकांची होणारी गर्दी बघता, नाशिक जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मंदिर परिसरात बॉम्ब स्कॉड आणि आणि डॉग स्कॉड कडून दिवसातून दोनदा तपासणी केली जाते. तसेच त्र्यंबकेश्वर ट्रस्टच्या वतीने देखील मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे..

हेही वाचा : Feeding milk Snakes : नागपंचमीला नागांना दूध पाजणे श्रद्धा नसून अंधश्रद्धा - सर्पमित्र दत्ता बोबे

Last Updated : Aug 1, 2022, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.