नाशिक - अनेक गुन्हे हे नकळत किंवा रागाच्या भरात घडत असतात. अनेक गुन्हेगार नाशिक जिल्ह्यातील कारागृहात शिक्षा भोगत आहेत. गुन्हेगारांना सुधारण्याची संधी मिळावी. यासाठी गुन्हेगार सुधार योजना, 2021 हा आदेश नाशिक पोलीस आयुक्तालयांतर्गत काढण्यात आला आहे. यामुळे गुन्हेगारांना सुधारण्याची एक चांगली संधी मिळणार आहे.
गुन्हेगार सुधार योजना मेळाव्याच्या माध्यमातून शहरातील विविध पोलीस ठाण्यातील तब्बल 250 गुन्हेगारांकडूनच गुन्हे न करण्याचा हमी पत्र भरून घेतले गेले आहे. त्यांना मोक्कातून मुक्त केले आहे. तसेच त्यांना त्यांचे पुढील आयुष्य जगण्यासाठी व समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शासनाकडून काही मदत उपलब्ध होत असल्याचे ती मदत मिळविण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले. गुन्हेगारांना सुधारण्याची पोलीस मॅनुअलमध्ये तरतूद आहे त्यानुसारच ही योजना राबवली जात असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
चार मेळाव्यातून 250 गुन्हेगारांनी मागितली सुधारण्याची संधी
नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये याबाबतचे चार मेळावे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 250 गुन्हेगारांनी सुधारण्याची संधी मागितली आहे. त्यानुसार त्यांनी हमीपत्रदेखील लिहून दिल्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले. त्यातील सहा जणांची नावे वगळण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
जानेवारीपासून आतापर्यंत 108 लोकांवर मोक्का अंतर्गत कारवाई
नाशिकमधील गुन्हेगारांवर कायद्याचे वचक निर्माण करण्यासाठी यावर्षी म्हणजेच जानेवारी, 2021 पासून आजपर्यंत विविध 108 गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त पांडे यांनी दिली.
हेही वाचा - नाशिक येथे मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात