ETV Bharat / city

नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची बदली; कैलास जाधव नवीन आयुक्त

आज दिवसभरापासून गमे यांच्या बदलीची समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू होती. ही केवळ चर्चा असल्याने या बातमीला दुजोरा मिळत नव्हता.

author img

By

Published : Aug 26, 2020, 7:17 PM IST

nashik
संग्रहित छायाचित्र

नाशिक - महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बदलीच्या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. गमे यांच्या जागी औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज दिवसभरापासून गमे यांच्या बदलीची समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा सुरू होती. ही केवळ चर्चा असल्याने या बातमीला दुजोरा मिळत नव्हता. मात्र, दुपारी उशिरा राधाकृष्ण गमे यांच्या जागी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आल्याचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे.

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले कैलास जाधव सध्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी ठाणे मुंबई-पुणे-नाशिक यासह विविध जिल्ह्यात यापूर्वी काम केले आहे. नाशिक जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. महसूल अधिकारी व प्रशासन अधिकारी यांची संघटना बांधण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

नाशिक महानगर पालिकेच्या आयुक्तपदावर असलेले राधाकृष्ण गमे यांनी त्यांच्या कार्यकाळात नाशिक शहरात अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिकला 11 व्या स्थानी तर स्मार्ट सिटी प्रकल्प राज्यात पहिल्या आणि देशात पंधराव्या क्रमांकावर आणण्यात गमे यांचे मोठे योगदान राहिले आहे. कोरोनाच्या लढ्यात त्यांनी तळागाळात जाऊन काम केले. उत्तम प्रशासक आणि लोकाभिमुख कार्यशैली यामुळे राधाकृष्ण गमे यांचा नाशिक मनपाच्या आयुक्तपदाचा कार्यकाळ निर्विवादपणे पार पडला.

नाशिकमधील वादात असलेला बांधकाम व्यावसायिकांचा प्रश्न देखील त्यांनी त्यांच्या कार्यकुशलतेतून मार्गी लावला. तर नव्याने येणारे कैलास जाधव हे देखील उत्तम प्रशासक म्हणून परिचित आहेत. आजवरचा त्यांचा कार्यकाळ निर्विवादपणे सुरू असून नाशिकमध्ये त्यांच्या कार्याची अनुभूती मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.