नाशिक - जूनच्या सुरुवातीपासून कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. तर, दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दारात वाढ होत असल्याने नाशिककरांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
अद्याप जिल्ह्यातील व्यवसाय, उद्योग पूर्वपदावर आले नसून सर्व स्तरांवर आर्थिक अडचणीत वाढ झालीय. यातच सातत्याने होणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या भाववाढीमुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री बसलीय. शहरातील पेट्रोल दर 78.73 रुपये आणि डिझेलचे दर 67.61 रुपये होते. मात्र आज पेट्रोलचे भाव 86.92 आणि डिझेल दर 77.40 झाले आहेत. यामुळे पेट्रोलच्या दरात 8 रुपये आणि डिझेलच्या भावात 9 रुपयांची वाढ झालीय.
एकीकडे शहरात कोरोनाचा आकडा वाढत असून नाशिकच्या पंचवटी, मेनरोड, आडगाव, नाशिक रोड आदी भागांत दुकानदारांनी स्वयंमस्फूर्तीने दुकानं बंद ठेवली आहेत. पुढील काही दिवसांसाठी त्यांचे व्यवसाय बंद असणार आहेत. अशात नागरिक देखील कमी संख्येने घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपावर तुरळक गर्दी आहे. मात्र, कमी गर्दी आणि वाढलेले दर यामुळे पंपचालकांनाही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.