ETV Bharat / city

बालिकेच्या श्वसनलिकेत अडकलेले नाणे काढण्यात डॉक्टरांना यश - sanjay gangurde

रिया गुरुवारी संध्याकाळी खेळत असताना तिच्या श्वसननलिकेत एक रुपयाचे नाणे अडकले होते.

शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आणि मुलगी
author img

By

Published : May 24, 2019, 7:36 PM IST

नाशिक - सातवर्षीय मुलीच्या श्वसनलिकेत अडकलेले एक रुपयाचे नाणे शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आले आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्टर संजय गांगुर्डे यांनी ही शस्त्रक्रिया केली. रिया देवरे, असे या मुलीचे नाव आहे.

रियाने (हनुमान चौक, सिडको) गुरुवारी संध्याकाळी खेळत असताना एक रुपयाचे नाणे गिळले होते. ते नाणे तिच्या घशात अडकले. यामुळे तिला गिळायला आणि श्वास घ्यायला त्रास सुरू झाला. ही गोष्ट तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रियाला खासगी रुग्णालयात नेले. मात्र, तेथे नाणे न निघाल्याने आज दुपारी ३ वाजता तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेच कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉक्टर संजय गांगुर्डे यांनी तिला तपासून पुन्हा एक्स-रे काढून खात्री केली. यानंतर त्या रुग्णास जास्त त्रास होऊन लागल्याने त्वरित दुर्बिणीद्वारे पूर्ण भूल देऊन श्वासनलिकेवर अडकलेले नाणे डॉक्टरांना काढण्यात यश आले. या शस्त्रक्रियेला २ तासांचा कालावधी लागला.

जिल्हा रुग्णालय नाशिक येथील भूलतज्ञ डॉक्टर चौधरी डॉक्टर तडवी आणि शस्त्रक्रिया विभागाच्या परिचारिका तसेच इतर स्टाफने त्यांना सहकार्य केले.

Intro:सात वर्षीय मुलीच्या श्वासनलिकेत एक रुपयाचे नाणे काढण्यात सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर संजय गांगुर्डे यांना यश आलेय..

Body:रिया देवरे वय सात वर्ष राहणार हनुमान चौक सिडको नाशिक काल संध्याकाळी खेळत असताना एक रुपयाचे नाणे तोंडातून घशात अडकल्याने तिला गिळायला व श्वास घ्यायला त्रास झाल्याने तिच्या आई-वडिलांनी रियाला प्रायव्हेट हॉस्पिटल कडे नेले परंतु तेथे नाणे न निघाल्याने आज दुपारी तीन वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले..त्यानंतर लगेच कान -नाक -घसा तज्ञ डॉक्टर संजय गांगुर्डे यांनी तपापासून पुन्हा एक्स-रे काढून खात्री केली त्यानंतर त्या रुगण्यास जास्त त्रास होऊन लागल्याने त्वरित दुर्बीण द्वारे पूर्ण भूल देऊन श्वासनलिकेच्या वर अडकलेले एक रुपयाचे नाणे डॉक्टरांना काढण्यात यश आलेय..

Conclusion:यामध्ये जिल्हा रुग्णालय नाशिक येथील भूलतज्ञ डॉक्टर चौधरी डॉक्टर तडवी ओटि. सिस्टर परदेशी व इतर स्टाफने त्यांना सहकार्य केलय.. दोन तासाच्या शस्त्रक्रियेनंतर नाणे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलेय..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.