नाशिक - ओमायक्रॉन (Omicron) व कोरोनाचा (Corona) वाढता प्रादुर्भाव बघता शहरासह जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते नववी व अकरावीचे वर्ग येत्या सोमवारपासून ३१ जानेवारीपर्यंत बंद (Schools Closed in Nashik) करण्यात येत आहेत. फक्त दहावी व बारावीचे वर्ग सुरू राहतील, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ (Minister Cahhagan Bhujbal) यांनी दिली आहे.
- १४ आश्रम शाळेतील मुलं कोरोना पॉझिटिव्ह, तर एक मुलगा ओमायक्रॉनबाधित -
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गुरुवारी (६ जानेवारी) झालेल्या कोरोना आढावा बैठकीनंतर पालकमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यात १४ आश्रम शाळेतील मुलं कोरोना पॉझिटिव्ह असून एक मुलगा ओमायक्रॉनबाधित आहे. लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण बघता मुंबई, ठाणे, पुणे येथील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यामध्येही आपण हा निर्णय घेत आहोत. शाळा आँनलाईन सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे, असे भुजबळ म्हणाले.
- अंत्ययात्रा व दशक्रिया विधीसाठी ५० लोकांना परवानगी -
३१ जानेवारीपर्यंत परिस्थितीचा आढावा घेतला जाईल व त्यानंतर शाळांबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या धार्मिक यात्रांना परवानगी नाकारण्यात येत आहे. नागरिकांनी लग्न समारंभ ५० जणांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरे करावे. अनेक लोक फार्म हाऊस, शेतावर, वस्तीवर लग्न करत आहेत. नियमांचे उल्लंघन आढळल्यास ग्रामीण पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. दोनही डोस घेतल्याशिवाय सरकारी आणि निमशासकीय कार्यालये कुठेही प्रवेश मिळणार नाही. तसेच मंदिरांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी पुजारी आणि विश्वस्त यांनी घ्यावी, अंत्ययात्रा व दशक्रिया विधीसाठी यापुढे ५० लोकांना परवानगी असेल, असे या वेळी भुजबळ यानी सांगितले आहे.
राजकीय पक्षांनी कार्यक्रम रद्द करण्याची गरज
सगळ्यांनी नियम पाळायला हवे
६०० मेट्रिक टन आँक्सिजन साठा उपलब्ध
पर्यटन स्थळांबाबत पुढील आठवड्यात निर्णय
८ दिवसात नो व्हेक्सीन नो रेशन सुरू करणार
दोनही डोस घेतल्याशिवाय सरकारी आणि निमशासकीय कुठेही प्रवेश मिळणार नाही
- ८ दिवसात नो व्हॅक्सीन नो रेशन सुरू करणार - भुजबळ
नाशिक जिल्ह्यात नववर्षाच्या सुरुवातीलाच रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एका दिवसात शंभरच्या आत असणारी रुग्ण संख्या आता थेट पाचशेच्या वर आली आहे. जर येत्या आठ दिवसात नागरिकांनी लस घेतली नाही तर रेशन मिळणार नाही. त्यामुळे पुढील आठ दिवसात नागरिकांनी लस घेण्यास वेळ देत आहोत. सर्वांनी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. अन्यथा राशन मिळणार नाही, अशी तंबी भुजबळ यांनी दिली आहे.