नाशिक - हाथरस प्रकरणातील बलात्कारींना फाशीची शिक्षा द्या. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीच्या निषेधार्थ भारतीय ट्रेड युनियनच्या वतीने विविध मागण्या घेऊन सिटुचे कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत सरकारचा निषेध केला.
हा मोर्चा गोल्फ क्लब पासून जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार होता. मात्र, मोर्चाला असलेली हजारो कामगारांची गर्दी लक्षात घेता हा मोर्चा डॉ. आंबेडकर पुतळ्या जवळ अडवण्यात आला. अखेर संतप्त झालेल्या कामगारांनी त्याचठिकाणी ठिया मांडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.