ETV Bharat / city

गोदावरीच्या प्रदूषित फेसामधून नागरिकांना शोधावा लागतोय रस्ता - Nashik latest

एकीकडे पर्यावरण दिन साजरा केला जात आहे तर दुसरीकडे नाशिक शहरापासून काही अंतरावर असलेल्या ओढा येथे गोदावरी नदीत प्रदूषणामुळे नदीच्या पाण्याला प्रचंड फेस आला आहे.

फेसामधून काढावा लागतोय रस्ता
फेसामधून काढावा लागतोय रस्ता
author img

By

Published : Jun 6, 2021, 12:13 PM IST

नाशिक - नाशिकच्या गोदावरी मधील वाढत्या प्रदूषणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरापासून काही अंतरावर ओढा परिसरात गोदावरीचे बिकट रूप बघायला मिळत आहे. नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ नक्की काय भूमिका घेणार याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागून आहे.

प्रदुषित झालेली गोदावरी नदी

फेसामधुन वाहनचालकांना करावा लागतो प्रवास

गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले असताना प्रत्यक्षात मात्र गोदावरी नदीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या ओढा येथे गोदावरी नदीत प्रदूषणामुळे नदीच्या पाण्याला प्रचंड फेस आला आहे. अशा स्थितीत दुचाकीस्वारांना आणि वाहनचालकांना मार्ग काढीत यावे लागत आहे.

जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेवर पर्यावरण प्रेमींचे लक्ष

विशेष म्हणजे पर्यावरण सप्ताह साजरा केला जात असताना, अशा वेळी नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ नक्की काय भूमिका घेणार याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागून आहे. गोदावरी नदी ही सहा राज्यातून जाणारी जीवनदायिनी आहे. मात्र नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी अपेक्षित प्रयत्न केले जात नाही. त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे उगमस्थान असलेल्या ठिकाणापासून नदीचे प्रदूषण सुरू होते. त्या संदर्भात नाशिक मधील काही पर्यावरणप्रेमींनी 2012 मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याआधारे विविध प्रकारचे आदेश उच्च न्यायालयाने वेळोवेळी दिले आहेत. 2018 मध्ये या याचिकेवर निकाल लागला मात्र त्यानंतरही नाशिक शहरात तपोवन टाकळी आणि ओढा या परिसरात मोठ्या प्रमाणात फेसाळ नदी वाहत आहे.

हेही वाचा - दक्षिण काशी पैठणनगरीत गोदावरीला गटाराचे स्वरुप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.