ETV Bharat / city

पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; मग तिकीट वाटपाच्या चर्चा करा - भुजबळ

पुण्याताील पूरपरिस्थिती गंभीर असतानाही राज्यातील मंत्री मात्र तिकीट वाटपावर चर्चा करण्यात दंग असल्याची टीका, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.

author img

By

Published : Sep 26, 2019, 3:10 PM IST

Updated : Sep 26, 2019, 5:59 PM IST

छगन भुजबळ

नाशिक - पुण्यात सध्या भयंकर पूरस्थिती आहे. मात्र, तरीही त्यावर बोलण्याऐवजी राज्यातील मंत्री हे तिकीट वाटपावर चर्चा करण्यात व्यस्त असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.

पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; मग तिकीट वाटपाच्या चर्चा करा - भुजबळ

मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गुरूवारी बैठक होत आहे. या बैठकीसाठी भुजबळ यांना रवाना व्हायचे हाते. यासाठी भुजबळ यांनी आपल्या नाशिक जिल्ह्यातील बैठका व इतर कार्यक्रम रद्द केले. नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात झालेल्या एका बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा... पुण्यात पावसाचे थैमान; चारचाकी गेली वाहुन, कार चालकाचा मृत्यू

राज्यातील नेते जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत

सांगली येथील पुरावेळीही राज्यातील मंत्री महाजनादेश यात्रेत अडकले होते. यामुळेच त्यांनी पुराकडे लक्ष दिले नाही. आताही पुण्यात सध्या पूरपरिस्थिती गंभीर आहे. मात्र, राज्यात पुण्यासह कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडालेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मात्र युतीच्या जागा वाटपात व्यस्त असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. राज्यातील मंत्री तिकीट वाटपावर चर्चा करत आहेत. यापेक्षा त्यांनी पुण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, नंतर तिकीट वाटपाकडे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

पवार साहेबांना पाठींबा देण्यासाठी मुंबईला जाणार

उद्या शुक्रवारी शरद पवार हे ईडी कार्यालयात जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक येथे घेण्यात आलेल्या बैठकीत आम्ही सर्व कार्यकर्ते शुक्रवारी मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयात जमून पवारांना पाठिंबा देणार आहोत, असे भुजबळ यांनी सांगितले आहे.

हेही वाचा... धक्कादायक : जळगावात सासू-सून-सासरा करत होते ज्वारीची कापणी, काळ बनून पाच जणांवर कोसळली वीज

सत्ताधाऱ्यांना भुजबळांचा टोला

गेल्या ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराच्यावेळी देखील मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांसह महाजनादेश यात्रेत व्यस्त होते. त्यावेळी त्यांनी वेळीच यात्रा सोडून कोल्हापूर, सांगली सातारा येथे धाव घेतली असती, तर झालेली जीवित व वित्तहानी आणखी काही प्रमाणात टाळता आली असती. दोन दिवस आधीच अलमट्टी धरणाच्या विसर्गाबाबत कर्नाटकशी बोलणे झाले असते, तर परिस्थिती नियंत्रणात आली असती. मात्र, मुख्यमंत्र्यांना महाजनादेश यात्रा महत्त्वाची वाटली असावी, असा टोला भुजबळ यांनी यावेळी लगावला.

ईडीबाबत केले वक्तव्य

आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न सरकार करणार असेल तर आम्ही कायदेशीर मार्गाने त्याला विरोध करू, असे बोलत आम्ही कोणत्याही कारवाईला सामोरे जाऊ असे भुजबळ यावेळी म्हणाले.

Intro:Body:

Nashik Breaking - 

@ छगन भुजबळ : नाशिक 

- माघेही मंत्री महाजनादेश यात्रेत अडकले होते म्हणून पुराकडे लक्ष दिले नाही 

- पुण्यात सध्या पूरपरिस्थिती गंभीर आहे 

- कितीही मदत केली तर सांगली कोल्हापूर सारख शहर पुन्हा उभं राहायला दहा वर्षे लागतील 

- मंत्री तिकीट वाटपावर चर्चा करताय, पुण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, तिकडे नंतर लक्ष दिले तरी चालेल 

- सत्ताधाऱ्यांना भुजबळांचा टोला

- उद्या पवार साहेब ईडी कार्यालयात जाणार असल्यानं 

- आम्ही सर्व मुंबई राष्ट्रवादी कार्यालयात जमून पवारांना पाठिंबा देणार 

- भुजबळांचा नाशिकमधील बैठकीत निर्णय 

- ईडीने तेव्हाही कलम वाढविले होते 

- त्यावेळी अँटी करप्शनने ४०९ कलम टाकले होते 

- मात्र ते कोर्टाने मान्य केलं नव्हतं 

- तपासणीत काही समोर आले नसतांना देखील कलम का टाकले माहिती नाही असेल

- मात्र घाबरवण्याचा प्रयत्न असले तर आम्ही कायदेशीर मार्गानं त्याला विरोध करू

Conclusion:
Last Updated : Sep 26, 2019, 5:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.