नाशिक: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी (MLA chhagan bhujbal) महात्मा फुले समता परिषदेत (Equality Council) केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं. दरम्यान, भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेवुन याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. समता परिषदेतील वक्तव्याचं राजकारण (statement in Samata Parishad is politicized) केलं जात आहे असं ते म्हणाले. कार्यक्रमात मी माझं वैयक्तिक मतं मांडलं. मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे अस भुजबळांनी आवर्जून सांगितलं.
प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य- भुजबळ (freedom of expression) महात्मा फुले (Mahatma Phule), सावित्रीबाई फूले (Savitribai Phule) , छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj), शाहू महाराज (Shahu Maharaj), हे आपले देव आहेत. या महापुरुषांनी शिक्षणासाठी खूप काम केले आहे. सरस्वतीचं आपण पूजन करतो, त्यांनी काय आपल्याला शिकवले नाही. त्यांनी कुठे शाळा काढली नाही. सावित्रीबाई यांनी पहिली शाळा काढली. त्यामुळे मी सरस्वतीऐवजी महापूरूषांची पूजा करा अस म्हणालो असं भुजबळ म्हणाले.
काय बोलले होते छगन भुजबळ? अखिल भारतीय समता परिषदेच्या (All India Equality Council) व्यासपीठावर बोलताना भुजबळांनी हे विधान केले. छगन भुजबळ म्हणाले की, शाळेत सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो लावा. सरस्वतीचा, शारदा मातेचा फोटो लावला जातो. ज्यांना आम्ही पाहिलं नाही. ज्यांनी शिकवलं नाही. असेलच शिकवलं तर ते फक्त 3 टक्के लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवले त्यांची पूजा कशासाठी करायची? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला होता.