ETV Bharat / city

येवला व लासलगावात छगन भुजबळांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी - chagan bhujbal

लासलगाव आणि येवला परिसरात कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ लासलगाव मध्ये आले होते. नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश भुजबळ यांनी दिले आहे.

छगन भुजबळ
छगन भुजबळ
author img

By

Published : Sep 30, 2021, 1:11 PM IST

येवला (नाशिक) - राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला व लासलगाव मध्ये पावसाने नुकसान झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

छगन भुजबळांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
लासलगाव नुकसानीची पाहणीलासलगाव परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे तसेच साठवलेल्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कांदा व्यापाऱ्यांनी आपल्या गोडाऊनमध्ये जो कांदा साठवला होता तो देखील या पावसाने भिजला गेला आहे. तसेच लासलगाव ग्रामीण रुग्णालयात बुधवारच्या पावसाने मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ लासलगाव मध्ये आले होते. नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश भुजबळ यांनी दिले आहे. येवल्यात रात्री केली पाहणीयेवला शहरात झालेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे घरामध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरले होते. यावेळी भुजबळ यांनी दुकानदारांशी संवाद साधला.येवला येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करून देखील त्वरित भरपाई मिळण्यासाठी मदत करणार असल्याचे भुजबळ यांनी सांगितले आहे. हेही वाचा - अतिवृष्टीतील एकही नुकसानग्रस्त व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही -ॲड. यशोमती ठाकूर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.