ETV Bharat / city

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ‘भारत बंद’ मध्ये सहभागी व्हावे - पालकमंत्र्यांचे आवाहन - chhagan bhujbal on farmer protest

केंद्र सरकारच्या अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे. हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाब आणि हरयाणातील लाखो शेतकरी गेल्या अकरा दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील सर्वांनी ८ डिसेंबरच्या 'भारत बंद'मध्ये सहभागी होण्याचे आवाहन भुजबळ यांनी केले आहे.

chhagan bhujbal news
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ‘भारत बंद’ मध्ये सहभागी व्हावे - पालकमंत्र्यांचे आवाहन
author img

By

Published : Dec 7, 2020, 3:41 PM IST

नाशिक - राजधानीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनासाठी शेतकरी, व्यापारी, कामगारांनी ‘भारत बंद’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

chhagan bhujbal news
केंद्र सरकारच्या अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे.

केंद्र सरकारच्या अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे. हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाब आणि हरयाणातील लाखो शेतकरी गेल्या अकरा दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

शेतकऱ्यांच्या या ‘भारत बंद’ला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यासाठी राज्यभरातील शेतकरी, व्यापारी कामगारांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

केंद्र सरकारने कृषी विषयक काढलेल्या अध्यादेशाबाबत शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे जर शेतकरी हिताचे नसतील, तर अशा कायद्यांचा उपयोग काय, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यामुळे ही लढाई शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे, असे भुजबळ म्हणाले. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने केलेले कायदे रद्द करावे, हीच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या कायद्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा विरोध असून शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला पुकारलेल्या आंदोलनात देखील राज्यातील शेतकरी,व्यापारी, कामगार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला आहे. दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे रहावे, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.