ETV Bharat / city

राज ठाकरे आश्वासक चेहरा, पण परप्रांतीयविरोधी भूमिका बदलावी- चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Jul 18, 2021, 5:02 PM IST

मनसे प्रमुख राज ठाकरे हा आश्वासक चेहरा आहे. पण त्यांनी परप्रांतीय विरोधातील भूमिका बदलली तर आम्ही सोबत येऊ शकतो. माझ्या भूमिकेचा विपर्यास केला जातो, असे राज ठाकरे मला बोलले, असे सांगत भविष्यात दोन्ही पक्षाचे सुर जुळू शकतात, असे अप्रत्यक्ष सूतोवाच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

चंद्रकात पाटिल
चंद्रकात पाटिल

नाशिक - मनसे प्रमुख राज ठाकरे हा आश्वासक चेहरा आहे. पण त्यांनी परप्रांतीय विरोधातील भूमिका बदलली तर आम्ही सोबत येऊ शकतो. माझ्या भूमिकेचा विपर्यास केला जातो, असे राज ठाकरे मला बोलले, असे सांगत भविष्यात दोन्ही पक्षांचे सूर जुळू शकतात, असे अप्रत्यक्ष सूतोवाच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

राज ठाकरे आश्वासक चेहरा, पण परप्रांतीयविरोधी भूमिका बदलावी- चंद्रकांत पाटील

मनसेसोबत युती ही चर्चा पक्ष मंथन करून घेईल -
वसंतस्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोन्ही नेते विश्रामगृहावर मुक्कामी असून त्यांनी रविवारी सकाळी एकत्र मॉर्निंग वाॅक केला. त्यामुळे दोन्ही पक्षांनी युतीच्या चर्चेने जोर धरला आहे. त्याबाबत विचारल्यावर पाटील यांनी युतीची शक्यता नाकारली नाही. मनसे सोबत युती ही चर्चा पक्ष मंथन करून घेईल. मात्र, सध्या तरी कोणालाही सोबत घेण्याचा विचार नाही. आम्ही मुसलमान विरोधी नाही. मात्र, त्यांचे लांगुलचालन करत नाही. रयत, जानकर, आरपीआय सोबत आहेतच असे त्यांनी सांगितले आहे.

राज्याने इंधन दर 10 रुपयांनी कमी करावे -
इंधनावर केंद्र कर घेतो त्यात सर्व प्रोसेस असतात. राज्याला ते खर्च नसतात. मिळणारे कर उत्पन्न पूर्ण उत्पन्न असते. राज्याने दहा रुपये कमी करावे. मी केंद्राला दर कमी करण्याची मागणी करेल, असे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले आहे.

आषाढीला पूजेचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार -
आषाढीला विठ्ठलाची पुजा करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. तो आम्हाला, सगळ्यांना मान्य असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला एसटी बसने जावे ही अध्यात्मिक आघाडीची मागणी ही वारकऱ्यांची भावना आहे. ती शब्दशः कोणी घेऊ नये, असे पाटील म्हणाले.

राज्याच्या राजकारणात गोंधळात गोंधळ सुरूच आहे -
सध्या राज्याच्या राजकारणात गोंधळात गोंधळ चालू आहे. त्यामुळे निश्चित काय करत आहे. राज्यात हेच काही कळत नाही राज्य विकासाच्या ऐवजी राजकारणातून पुढे चालले आहे. असा खोचक टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना लगावला आहे. चंद्रकांत पाटील हे दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यासाठी शुक्रवारी नाशकात दाखल झाले होते. शनिवारी दिवसभर त्यांनी पक्षाच्या विविध संघटना तसेच विविध विभाग आणि शहरातील जिल्ह्यातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी चर्चा केली त्यानतर आज रविवारी आमदार, माजी आमदार व इतर पदाधिकार्‍यांशी चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले की, कधी पंतप्रधान मोदी-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटतात, तर कधी मोदी-पवार भेटतात नेमके काय सुरू आहे. सध्या हा माझाही गोंधळ झाला आहे. मात्र, माझ्या गुरूने मला शिकवण दिली आहे. जी जबाबदारी दिली ती पार पाडायची. शिकवणीप्रमाणे मी सध्या मला नेमून दिलेली जबाबदारी पार पाडतोय. त्यामुळे बाजूच्या खोलीत कोण काय करत आहे. हे मला माहिती नाही आणि त्यावर मी लक्ष देत नाही. परंतु या राज्याचे नागरिक म्हणून सध्या राज्य विकासापेक्षा राजकारणातच पुढे गेलेले आहे, असे चित्र दिसून येत आहे.

राज्यातील, पालिका निवडणुकांसाठी भाजपा तयार -
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोविडमुळे अनेक अडचणी येत होत्या. समस्यांना, लोकांना तोंड द्यावे लागत आहे. याही काळात मदतीसाठी, भाजपाने अग्रेसिव्ह पुढाकार घेतला आहे. कोविड सेंटर्ससह व्हॅक्सिनेशनपर्यंत सर्व बाबतीत मदत करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी हे आघाडीवर आहेत. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने व्हर्च्युअल संवाद साधला आहे. असे सांगून पाटील पुढे म्हणाले की, कोरोना कमी झालाय गेला असे नाही सर्वांनी काळजी घेऊन संघटनात्मक दौरा राज्यात सुरु झाले आहे. राज्यातील, पालिका निवडणुकांसाठी भाजपा तयार आहे.

संजय राऊत कशावरही बोलू शकतात त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही -
नाशकात, भाजपने जाहीर केलेल्या, जाहिरनाम्याची पूर्तता करते आहे. असे सांगून चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, नुकतीच सिटीलिंक बस सुरू झाली. यासारखी अनेक कामेही करण्यात आलेली आहेत. याबाबत स्थानिक पदाधिकारी हे सविस्तर माहिती देतील. 19 जुलैपासून सुरू होणाऱ्या सांसद पार्श्वभूमीवर मोदी-पवार भेट घेतली दुसरे कोणतेही कारण नाही. संजय राऊत कशावरही बोलू शकतात, त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. ते म्हणाले की, केंद्र सहकार खाते हे सहकाराच्या विकासासाठी स्थापन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व साखर कारखाने धोक्यात आले आहे. केंद्राने अनेक पॅकेज दिले आहे. सहकारात केंद्र सहकार समृद्ध करण्यासाठी या खात्याची निर्मिती करण्यात आली आहे. मुंबईतील पाचपेक्षा अधिक नागरिक हे भाड्याने राहतात. त्यामुळे प्रत्येकाने आपली काळजी घेतली पाहिजे. शहरात गर्दी वाढली, लोकांनीही वाट्टेल तिथे घरे बांधली आहे. पालिकेचेही दुर्लक्ष झाले. पण दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन आणि नागरिक दोघांनीही जागरूक असावे, असेही पाटील म्हणाले.

हेही वाचा - देवेंद्र फडवणीसांची वागणूक बघता ते 'नैराश्यात' गेल्यासारखे वाटतात - यशोमती ठाकूर

हेही वाचा - मुंबईत मुसळधार पावसादरम्यान 11 ठिकाणी दुर्घटना, 21 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.