ETV Bharat / city

नाशिकला निश्चित सूत्रानुसार रेमडेसिवीर वितरण करावे- छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक जिल्ह्यासाठी दररोज दहा हजार रेमडेसिवीरची मागणी असताना नाशिकला केवळ ४५० इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. त्या तुलनेत ठाणे, पुणेसह नागपूर शहराला तब्बल चौपट स्वरुपात म्हणजेच जवळपास १६०० हून जास्त इंजेक्शनचा दररोज पुरवठा केला जात आहे.

Chagan Bhujbal
छगन भुजबळ
author img

By

Published : Apr 26, 2021, 5:52 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील रेमडेवीरचा साठा सुरळीत होत नसल्याने आज मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्याला रेमडेसिविर इंजेक्शन निश्चित सूत्रानुसार वितरण करावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क करून परिस्थितीची माहिती दिली आहे. तसेच याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यात रुग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसेवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्याने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे गेल्या तीन दिवसांपासून राज्याचे अन्न, औषध प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंग यांच्याशी सातत्याने संपर्क करत आहेत. तसेच पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देत आहेत. मात्र, त्यानंतरही जिल्ह्यात रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठा झालेला नाही.

हेही वाचा-गडचिरोलीतील अहेरी तालुक्यात नक्षलवाद्यांनी केली जाळपोळ

यावेळी मुख्यमंत्री भुजबळांना म्हणाले की, केंद्राने रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोटा दुप्पट केल्यामुळे दुप्पटच्या हिशोबाने तसे वाटपसुद्धा सुरू करण्यात आले. मात्र स्टोकिस्टने वाढीव रेमडेसिवीरचा साठा दिलाच नाही. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये कमी साठा मिळाला. यात लक्ष घालून नाशिकवर अन्याय होऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना आश्वासन दिले आहे.

हेही वाचा-टाटा स्टीलकडून आठवडाभरात ऑक्सिजनची दुप्पट निर्मिती; रोज 600 टनचा पुरवठा

इतर जिल्ह्याच्या तुलनेत नाशिकला साठा कमी
याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यासाठी दररोज दहा हजार रेमडेसिवीरची मागणी असताना नाशिकला केवळ ४५० इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. त्या तुलनेत ठाणे, पुणेसह नागपूर शहराला तब्बल चौपट स्वरुपात म्हणजेच जवळपास १६०० हून जास्त इंजेक्शनचा दररोज पुरवठा केला जात आहे. लोकसंख्येच्या तुलनेत बाधितांची संख्या या शहरांपेक्षा नाशिक शहर व जिल्ह्यात अधिक आहे. नाशिकमध्ये कमी प्रमाणात रेमडेसिवीरचा पुरवठा होत असल्याने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, रेमडेसिवीर इंजेक्शनचे समन्यायी पद्धतीने वाटपासाठी राज्यस्तरावरून वाटप करत असताना सक्रीय रुग्णसंख्या विचारात घेऊन इंजेक्शन वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील २० एप्रिल २०२१ रोजीची सक्रिय रुग्णसंख्या ही राज्याच्या एकूण रुग्णसंख्येच्या ६.४८ टक्के असल्याचे दर्शविले आहे.

इतर जिल्ह्याचा साठा नाशिकमध्ये का?
धुळे व अहमदनगर जिल्ह्याकरिता देण्यात येणारा रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा नाशिक येथील वितरकांना देण्यात येतो. त्यामुळे हा साठा प्रत्यक्षात इतर जिल्ह्यांना जाणार असला तरी सुद्धा नाशिकच्या नावे नोंदविला जात असल्याने प्रत्यक्षात नाशिकला कमी साठा उपलब्ध होतो.
रुग्णसंख्येच्या तुलनेत जो साठा उपलब्ध व्हायला पाहिजे, त्यापेक्षा कमी साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यात जात असलेला साठा हा त्याच जिल्ह्याच्या वितरकांचे नावे देण्याबाबत या कंपनीचे अधिकारी यांना सूचित करण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्री भुजबळ यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्णांच्या तुलनेत येत असलेला रेमडेसिवीरचा साठा अतिशय कमी येत असल्याने नाशिककरांवर हा मोठ्या अन्याय होत आहे. नाशिक जिल्ह्यातील रेमडेसिवीरचा साठा सुरळीत करून हा अन्याय आपण दूर करावा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.