ETV Bharat / city

'दुष्काळग्रस्त परिस्थितीत 'हा' प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे' - पाणी पुरवठा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीची नोटीस देण्यात येत आहे. शेतकऱ्यांना बोंड अळीचे अनुदान मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी अडचणीत सापडल्या आहेत.

छगन भुजबळ यांचा दुष्काळ दौरा
author img

By

Published : May 4, 2019, 1:31 PM IST

नाशिक - दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीच्या नोटीसा येत आहेत. हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

येवला तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीची नोटीस देण्यात येत आहे. त्यात पुढील दीड दोन महिन्यात खरीप हंगाम सुरू होईल. तेव्हा बुडालेल्या नाशिक जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज कसे उपलब्ध होईल, असा प्रश्न आहे. याबाबत राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज उपलब्ध होईल, असे सांगण्यात येत असले तरी गेल्या ६ महिन्यांत शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठल्याच व्यवहार नसल्याने कर्ज मिळणार नाही, अशा अनेक व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या आहेत. दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्याकडे पैसे येणार तरी कसे आणि शेतकरी कर्ज कसे फेडणार, असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला.

शेतकऱ्यांना बोंड अळीचे अनुदान मिळालेले नाही. शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी अडचणीत सापडल्या आहेत. कुकुटुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर ७० हजारहून अधिक पक्षांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातील ३५ हजार पक्षांचा पाण्याअभावी मृत्यू झाला आहे. गेल्या ३-४ महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाकडे जनावरांच्या चारा नियोजनाबाबत पाठपुरावा सुरू होता. मात्र, शासनाने चाऱ्याचे योग्य नियोजन केल्याचे दिसत नाही. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून २०११ च्या लोकसंख्येनुसार २०१९ मध्ये पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे, असेही छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांनी यावेळी येवला तालुक्यातील गाव तळवाडी, महादेव नगर, ममदापूर, राजापूर, नगरसुल इत्यादी दुष्काळी गावांना भेटी देऊन त्यांनी व्यथा जाणून घेतल्या. त्यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसोबत येवला मध्यवर्ती प्रशासकीय संकुल येथे चर्चा केली. यावेळी माजी आमदार धनराज महाले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर महेंद्र मोहन शेलार, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, सचिन कळमकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:दुष्काळग्रस्त परिस्थिती शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार- छगन भुजबळ

Body:दुष्काळग्रस्त परिस्थिती शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा देण्यात येत असून हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे..
नाशिक जिल्ह्यात असलेल्या भीषण दुष्काळ ग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील गाव तळवाडी, महादेव नगर ,ममदापूर, राजापूर, नगरसुल इत्यादी दुष्काळी गावांना भेटी देऊन त्यांनी दुष्काळग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या, त्यांनी दुष्काळग्रस्त गावांची पाहणी केल्यानंतर त्यांची उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी व दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांसोबत येवला मध्यवर्ती प्रशासकीय संकुल येथे चर्चा केली, यावेळी माजी आमदार धनराज महाले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर महेंद्र मोहन शेलार विधानसभा अध्यक्ष वसंत पवार ,माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड ,सचिन कळमकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी बोलताना म्हणाले की येवला तालुक्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून ,शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून कर्ज वसुलीची नोटीस देण्यात येत आहे, त्यात पुढील दीड दोन महिन्यात खरीप हंगाम सुरू होईल तेव्हा बुडालेल्या नाशिक जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज कसे उपलब्ध होईल असा प्रश्न आहे, याबाबत राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज उपलब्ध होईल असे जरी सांगण्यात येत असले तरी गेल्या सहा महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठल्याच व्यवहार नसल्याने कर्ज मिळणार नाही अशा अनेक व्यथा शेतकऱ्यांनी मांडले आहेत, जो शेतकरी दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे या शेतकऱ्याकडे पैसे येणार तरी कसे असा सवाल देखील भुजबळ त्यांनी उपस्थित केलाय

भुजबळ पुढे म्हणाले की शेतकऱ्यांना बोंड आळीचे अनुदान देखील मिळालेले नाही ,शेतकऱ्यांच्या फळबागा पाण्याअभावी अडचणीत सापडल्या आहेत, कुकुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर 70 हजार हून अधिक पक्षांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे ,यातील 35 हजार पक्षांचा पाण्या अभावी मृत्यु झाला आहे.गेल्या तीन ते चार महिन्यापासून जिल्हा प्रशासनाकडे जनावरांच्या चारा नियोजनाबाबत पाठपुरावा सुरू होता,मात्र शासनाने चाऱ्याचे योग्य नियोजन केल्याचे दिसत नाही, त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाल्याचे दिसत आहेत, जिल्हा प्रशासनाकडून 2011 च्या लोकसंख्येनुसार 2019 मध्ये पाणी पुरवठा केला जात आहे ,पाण्याचे टँकर उपलब्ध होत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला असल्याचे सांगून त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केले...
टीप फोटो व्हॉटस अप

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.