ETV Bharat / city

Devendra Fadnavis in Nashik : नाशिक महानगरपालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा फडकणार - देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस नाशिक दौरा

नाशिक महानगरपालिकेवर (Nashik Corporation) पुन्हा भाजपचा भगवा फडकेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis in Nashik) यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Feb 21, 2022, 7:13 PM IST

Updated : Feb 21, 2022, 9:10 PM IST

नाशिक - महानगरपालिकेवर (Nashik Corporation) पुन्हा भाजपचा भगवा फडकेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis in Nashik) यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे 100 प्लस नगरसेवक निवडूण आणण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी पर्यंत करावे, असे प्रतिपादन फडणवीसांनी केले. नाशिकमध्ये आयोजित भाजप मेळाव्यात फडणवीस बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

नाशिक महानगरपालिकेवर पुन्हा भाजपचा भगवा फडकणार असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. काही लोक भगवा घेऊन इकडे तिकडे मिरवतात, भगवा फक्त भाजप सुरक्षित ठेवू शकतो, असं म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेवर टीका केली. नाशिकला आयोजित भाजप मेळाव्यात फडणवीस यांच्यासमवेत माजी मंत्री जयकुमार रावल, आजी-माजी आमदार, नगरसेवक, भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

दत्तक घेणे म्हणजे दलाली करणं नाही -

मी नाशिक दत्तक घेतले आहे ते महानगरपालिकेत दलाली करण्यासाठी नाही, तर दत्तकचा अर्थ देशातील योजना आणून दाखवू की नाशिकचा कसा चांगला विकास करता येईल, असे फडणवीस यांनी म्हटलं आहे. आम्ही नाशिकमध्ये निओ मेट्रोचे मॉडेल केले. हा प्रकल्प अंतिम मंजुरीला आहे. राज्य सरकारने खो घातला नाही तर तीन वर्षात मेट्रो सुरू होणार आहे. भविष्यात नाशिक ग्रीन ट्रान्सपोर्ट करणार, निर्मल नाशिक तयार करणार, नाशिक प्रदूषणमुक्त करणार. तसेच गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. भाजपने सुरू केलेल्या नवीन बस सेवेच्या माध्यमातून 65 लाख लोकांनी प्रवास केला आहे. त्यामुळे फडणवीस यांनी महानगरपालिकेच्या कामाचे कौतुक केले. समृद्धी महामार्ग झाल्यावर आयटीच्या माध्यमातून नाशिकच्या तरुणांना रोजगार मिळणार आहे, असे ते म्हणाले.

कोरोना काळात भाजपने संघर्ष केला-

कोरोना काळात नाशिकवर अन्याय झाला, राज्य सरकारने नाशिककडे दुर्लक्ष केलं, भाजपने संघर्ष करून रूग्णांना ऑक्सिजन मिळून दिला..सध्या राज्यात सरकारचे अस्तित्व दिसत नाही. भ्रष्टाचार, दुराचारामुळे राज्य होरपळून निघत आहे, असे म्हणत फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

भाजपचे तिकीट मिळणं म्हणजे निवडून येणे -

भाजपचे तिकीट मिळणं म्हणजे निवडून येणे असे समीकरण झालं आहे. मात्र, आता तिकीट देताना नेत्यांनी नातेवाईकांचा विचार करायचा नाही तर कार्यकर्त्यांचा विचार करायचा, असं म्हणत यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले.

Last Updated : Feb 21, 2022, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.