ETV Bharat / city

लॉकडाऊन संकट; वीजबिल माफ करुन नागरिकांना दिलासा द्या - चित्रा वाघ

author img

By

Published : Jun 23, 2020, 3:07 PM IST

Updated : Jun 23, 2020, 3:31 PM IST

लॉकडाऊन काळात वीज वितरण कंपनीने वीज बिलात वाढ केली. ग्राहकांच्या वीज मीटरचे रीडिंग न घेता सरसकट ऑनलाइन बिल पाठवण्यात आले आहे. अशात अनेक ग्राहकांना तिप्पट वीज आकारण्यात आले. एकीकडे लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्याने सर्वच जण घरात बसून होते. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

nashik
संग्रहित छायाचित्र

नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्याने सर्वच नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशात वीज नियमक आयोगाच्या 30 मार्चच्या आदेशानुसार वीज बिलात मोठी वाढ करून ग्राहकांच्या अडचणीत अधिक भर टाकली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन काळात आकारण्यात आलेले वीजबिल माफ करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ

कोरोना विषाणूचा प्रदूर्भाव रोखण्यासाठी देशासह महाराष्ट्रात अडीच महिने लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात वीज वितरण कंपनीने वीज बिलात वाढ केली. ग्राहकांच्या वीज मीटरचे रीडिंग न घेता सरसकट ऑनलाइन बिल पाठवण्यात आले आहे. अशात अनेक ग्राहकांना तिप्पट वीज आकारण्यात आले. यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्याने सर्वच जण घरात बसून होते. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आता अनलॉक सुरू झाले असले, तरी उद्योग व्यवसायाला पाहिजे तशी चालना मिळाली नाही. आर्थिकचक्र संथ गतीने सुरू आहे. या आर्थिक संकटात अनेक उद्योग तीस-चाळीस टक्के कामगारांवर सुरू असून इतर कामगार बेरोजगार म्हणून घरी आहेत. अशात वीज वितरण कंपनीचा तिहेरी मारा नागरिकांच्या अडचणीत अधिक भर टाकत आहे. महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन काळात आकारण्यात आलेले वीजबिल माफ करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.

महापालिका क्षेत्रातील वीज ग्राहकांना वीज बिलामध्ये प्रत्येकी 10 रुपये कोविड 19 अधिभार लावण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Jun 23, 2020, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.