नाशिक: मशिदीवरील भोंगे न काढल्यास मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा मनसेने दिल्यानंतर, राज्यात धार्मिक वातावरण तापले आहे. धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे ( Police Commissioner Deepak Pandey ) यांनी भोंग्यांबाबत नवीन नियमावली जाहीर ( Loudspeaker New rules ) केली आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील सय्यद पिंप्री येथे पोलिसांनी मशिदीवरील भोंग्याचा आवाज ( Mosque Loudspeaker Sound ) डेसिबलमध्ये मोजण्यास सुरुवात केली आहे.
तसेच नाशिक जिल्ह्यातील धार्मिक स्थळी लावण्यात आलेल्या भोंग्यांच्या आवाजाची मर्यादा पोलीस आणि ध्वनी प्रदूषण मंडळ एकत्रितपणे तपासणार आहेत. दिवसा 55 तर रात्री 45 पेक्षा जास्त डेसिबल असल्यास पोलीस कारवाई कारवाई करणार आहे.राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर नाशिक पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.
असे आहेत आदेश -
मशिदीपासून 100 मीटरच्या आत पाच वेळच्या नमाजच्या वेळी कुणालाही भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणता येणार नाही.
ज्यांना 100 मीटर दूर अंतरावर म्हणायचे असेल त्यांना 3 मे पर्यंत परवानगी घ्यावी लागणार आहे.
ध्वनी प्रदूषणाविषयी नियमांचे पालन करूनच हनुमान चालीसा किंवा नमाज पठण करावे लागणार आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी 70 ते 75 डेसिबल, व्यावसायिक क्षेत्र 55 ते 65 डेसीबल, निवासी क्षेत्र 45 ते 55 डेसीबल तसेच न्यायालय रुग्णालय, शासकीय कार्यालयाने, शाळा असलेल्या शांतता झोनमध्ये 40 ते 50 डेसीबल पर्यंत आवाजाची मर्यादा ठेवण्यात आली आहे.
तुरुंगवास किंवा हद्दपार -
हनुमान चालीसासाठी परवानगी शिवाय कोणाला भोंगे लावता येणार नाहीत. भोंगे लावण्याच्या नावाखाली कुणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास, 4 महिने तुरुंगवास शिक्षा करण्यात येईल. तसेच याशिवाय थेट हद्दपार किंवा 6 महिने प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत आणखी 6 महिने कारावास करण्याची तरतूद असलेला आदेश काढला आहे. राज्यात प्रथमच श्रीराम भूमी म्हटल्या जाणाऱ्या नाशिकसाटी असे आदेश काढले आहेत.
हेही वाचा - MNS Challenge to Police : तुरुंगात टाकले तरी चालेल, भोंगे वाजणारच; मनसेचे पोलिसांना आव्हान