नाशिक : बासुंदीत झुरळ टाकून व्हिडीओ (Basundi with cockroaches) तयार करून; दुकानाची बदनामी करण्याची धमकी देत, खंडणी उकळणाऱ्या भामट्या विरोधात नाशिकच्या (Nashik) दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Cases registered against extortionists) करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे नाशिकात अश्याप्रकारच्या दोन घटना घडलेल्या आहेत.
पहीली घटना : कॉलेज रोडवरील 'सागर स्वीटचे' संचालक रतन चौधरी यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीवरून 19 ऑगस्ट 2022 रोजी अजय राठोड याने सागर स्वीट या दुकानातून बासुंदी घेतली. त्यानंतर त्याने त्यात झुरळ टाकून त्याचा व्हिडिओ तयार केला. तो व्हायरल करण्याची तसेच सदर माहिती अन्न व औषध प्रशासनाला देण्याची धमकी देऊन एक लाख रुपयांची खंडणीची मागणी केली केली. त्या भामट्याने, खंडणी रक्कम विद्या विकास सर्कल येथील सागर स्विटच्या ऑफिसमध्ये दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी सात वाजता खंडणीच्या स्वरूपात घेतली होती. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 384,506 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहे.
दुसरी घटना : अशाच प्रकारची दुसरी घटना, सावरकर नगर गंगापूर रोड येथील, मधुर स्वीट या ठिकाणी सुद्धा घडली. मधुर स्वीट चे मॅनेजर मनीष चौधरी यांनी याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अजय ठाकूर यांच्या विरोधात तक्रार दिली. आहे. अजय ठाकूर याने 6 सप्टेंबर 2022 रोजी, मधुर स्वीट मधून खरेदी केलेल्या रबडी मध्ये झुरळ असल्याचे सांगून; तुमच्या दुकानाची बदनामी करेल, हे सर्व प्रकरण मिटवून घेण्यासाठी दुकानदाराकडे पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली होती. आणि चौधरी यांच्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात, अजय ठाकूर यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सीसीटीव्ही मधून प्रकार उघडकीस : दोन्ही घटनांमध्ये अजय राठोड या भामट्याने सागर स्वीट आणि मधुर स्वीट या दोन्ही दुकानां मधून रबडी विकत घेतली. त्यानंतर दुकानाच्या बाहेर येत त्यात झुरळ टाकले. मात्र हा सर्व प्रकार दुकानात असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी या पुराव्याच्या आधारे राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.