दिंडोरी - दिंडोरी येथील कादवा नगर परिसरामध्ये कामावर जात असलेल्या महिलेवर डिझेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या महिलेला रस्त्यात अडवून तिचा हात धरून आरोपी प्रकाश जयसिंग जाधवने हे कृत्य केले. जयसिंग जाधवने या महिलेला काठीने मारहाण करत हातात असलेल्या डिझेलच्या ड्रम मधून अंगावर डिझेल ओतले. त्यानंतर आगपेटीच्या साह्याने पेटवण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - India vs Australia: पहिल्या दिवशी भारताच्या ६ बाद २३३ धावा
पीडितेने आरोपीला धक्का मारुन तेथून पळ काढला. परंतु आरोपीने पीडितेस जिवंत मारण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भात दिंडोरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले यांनी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले हे करत आहेत.