ETV Bharat / city

नाशिक : 200 वर्षे जुन्या वृक्षांची कत्तल थांबणार; आदित्य ठाकरेंची आयुक्तांना आराखड्यात बदल करण्याची सूचना - उंटवाडी अवैध वृक्षतोड

उड्डाणपुलाला झाड अडथळा ठरत असल्याने ते तोडण्यासाठी पालिकेने या झाडांवर नोटीस ( Illegal tree cutting in Nashik ) लावली. मात्र, नाशिकरांनी या झाडाच्या कतलीला कडाडून विरोध केला आहे. जुना वटवृक्षांना हेरीटेजच्या दर्जा द्या, यासाठी नाशिककर प्रयत्नशील आहेत. पण, वटवृक्षावर कुर्‍हाड चालवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याचा विरोधाभास पहायला मिळाला. या अट्टाहसाला आदित्य ठाकरे यांनी लगाम घातला आहे. महापालिका आयुक्तांशी चर्चा केल्याचे त्यांनी टि्वट त्यांनी ( Atidya Thakarey on tree cutting ) केले आहे.

200 वर्षे जुन्या वृक्षांची कत्तल थांबणा
200 वर्षे जुन्या वृक्षांची कत्तल थांबणा
author img

By

Published : Jan 22, 2022, 7:13 PM IST

नाशिक - नाशिक शहराच्या मायकोसर्कल त्रिमूर्ती चौक दरम्यान उड्डाणपूल उभारला जात आहे. मात्र, हा उड्डाणपूल उभारत असताना यात अडथळा ठरणाऱ्या ५०० हून अधिक 200 ते 250 वर्ष जुन्या झाडांची कत्तल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला ( Illegal tree cutting in Nashik ) आहे. मात्र आता या निर्णयावर नाशिकरांनी सोशल मीडियावर मोहीम उभी केली आहे. नाशिककरांनी वृक्षतोडीला कडाडून विरोध ( Nashik citizens Agitation against tree cutting ) केला आहे.

नाशिक शहराच्या मायकोसर्कल ते त्रिमुर्ती चौक उड्डाणपुलामुळे उंटवाडी येथील 500हून अधिक 200 ते 250 वर्ष जुन्या झाडांची कत्तल करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्या विरोधात पर्यावरणप्रेमी एकवटले आहेत. त्याला यश भेटले आहे. शिवसेना युवा नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना फोन करुन उड्डाणपुलाच्या आराखड्यात बदल करण्यास सांगितले आहे.

आदित्य ठाकरेंचे ट्विट
आदित्य ठाकरेंचे ट्विट

हेही वाचा-Gang Rape In Mumbai : मुंबईत अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा नराधमांनी केला सामूहिक बलात्कार

५०० हून अधिक झाडांची कत्तल करण्याचा निर्णय-

उड्डाणपुलाला झाड अडथळा ठरत असल्याने ते तोडण्यासाठी पालिकेने या झाडांवर नोटीस लावली. मात्र, नाशिकरांनी या झाडाच्या कतलीला कडाडून विरोध केला आहे. जुना वटवृक्षांना हेरीटेजच्या दर्जा द्या, यासाठी नाशिककर प्रयत्नशील आहेत. पण, वटवृक्षावर कुर्‍हाड चालवण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू असल्याचा विरोधाभास पहायला मिळाला. या अट्टाहसाला आदित्य ठाकरे यांनी लगाम घातला आहे. महापालिका आयुक्तांशी चर्चा केल्याचे त्यांनी टि्वट त्यांनी ( Atidya Thakarey on tree cutting ) केले आहे.

हेही वाचा-Vaccination New Rule : कोरोनातून बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी मिळणार लसीकरणासह बुस्टर डोस, केंद्राचे राज्यांना निर्देश

राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनीदेखील झाडे तोडू नये या साठी स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्याबाबत ट्विट केले आहे. नाशिकरांच्या समाजमाध्यमांवरील या लढ्याला यश मिळत आहे. असे असले तरी जोपर्यंत लेखी खुलासा प्रशासन करत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय नाशिकरांनी घेतला आहे. त्यामुळे नेमका काय निर्णय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा-Pratap Sarnaiks tax waiver : प्रताप सरनाईक यांचा दंड माफ केल्याप्रकरणी भाजप आक्रमक; शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

आदित्य ठाकरेंचे पत्र अन् वाचले होते वटवृक्ष...
सांगलीतील मिरज येथील शेकडो वर्ष जुने व एक ते दीड एकरात पसरलेले वटवृक्ष राष्ट्रीय महामार्गचा कामात अडथळा येत असल्याने तोडले जाणार होते. पण पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध दर्शवित नागरिकांनी लढा उभारला. सोशल मीडियावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या लढ्याची दखल घेतली. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवित वटवृक्ष वाचविण्याची विनंती केली. त्यानंतर वटवृक्ष वाचविण्यात यश आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.