नाशिक - नाशिक महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली ( Nashik Municipal Corporation Election 2022 ) असून महत्वाच्या प्रभागांवर महिलांचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. या आरक्षणामुळे यंदाची ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक महापालिकेच्या 133 जागांपैकी 67 जागा महिलांच्या ताब्यात जाणार आहेत.
उर्वरित 22 जागांच्या आरक्षणाची सोडत चिठ्ठ्या टाकून काढण्यात आली. तसेच एकूण 133 जागांपैकी प्रत्येक प्रभागांमध्ये अ, ब, क असे गट पडले आहेत. तर 44 या प्रभागामध्ये दोन पुरुष आणि दोन महिला आरक्षण आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 19 जागा राखीव तर अनुसूचित जमातीसाठी 10 जागा राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी 19 पैकी दहा जागा महिलांसाठी राखीव तर अनुसूचित जमातीसाठी सहापैकी पाच जागा महिलांसाठी राखीव राहणार आहेत. उर्वरित 52 सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव आहे.
अनुसूचित जाती महिला आरक्षण - अनुसूचित जमाती महिलांसाठी एकूण पाच जागा असून 7 ब, अनुसूचित जमाती 11 ब, अनुसूचीत जमाती थेट आरक्षित राखीव असतील. तर 2 अ, 4 अ, 34 ब या जागा अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.
सर्वसाधारण महिला आरक्षण - नाशिक पालिका निवडणुकीमध्ये सर्वसाधारण महिलांच्या 12 जागेसाठी सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये 5 ब, 10 ब, 16 ब, 18 ब, 21 ब, 30 ब, 31 ब , 32 ब, 33 ब, 36 ब, 37 ब या प्रभागांत सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
अशी पार पडली प्रक्रिया - सुरुवातीला महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी आरक्षण सोडत कशी राबवली जाणार, याची माहिती दिली. तर उपायुक्त मनोज घोडे पाटील यांनी आरक्षण सोडत कशी काढली जाणार, याबाबत सविस्तर माहिती दिली. सुरुवातीला अनुसूचित जाती महिला राखीव गटासाठी चिठ्ठी सोडतीसाठी टाकण्यात आल्यानंतर महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते एक-एक चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
हेही वाचा - VIDEO : चालत्या गाडीतून मागे बसलेले प्रवासी पडले.. धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद