नाशिक - रेल्वे खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून नाशिक शहर वाहतूक पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने मित्राच्या सहकार्याने दोघांची 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाहतूक पोलीस कर्मचारी रमेश गोसावी आणि त्याचा मित्र सचिन मस्के या दोघांविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे खात्यात नोकरीच्या आमिषाने 18 लाखांची फसवणूक
सध्या सुशिक्षित बेरोजगार तरुनांना नोकरीचे आमिष दाखवत त्याची लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. याठिकाणी रेल्वे खात्यात नोकरी लाऊन देण्याचे आमिष दाखवत चक्क नाशिक शहर वाहतूक पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने आपल्या साथीदाराला सोबत घेत दोघांची 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याच उघड झाले आहे. दरम्यान आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच फसवणूक झालेल्या बाबाजी केदारे आणि स्वप्निल बागुल यांनी पंचवटी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने वारंवार संशयित वाहतूक रमेश गोसावी आणि सचिन म्हस्के यांनी वारंवार रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने एकूण 18 लाख रुपये उकळले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल
धक्कादायक बाब म्हणजे संशयितांनी बनावट ऑर्डर काढत आर्थिक तरुणांना कलकत्ता याठिकाणी पाठवले. मात्र अनेक वर्षे उलटूनही कायमस्वरूपी रेल्वे खात्यात नोकरी लागत नसल्याने संशय बळकावल्याने तरुणांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. दरम्यान, याप्रकरणी संशयित वाहतूक पोलीस कर्मचारी रमेश गोसावी आणि त्याचा मित्र सचिन मस्के या दोघांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.