नाशिक - उद्यापासून मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यात नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहाच्या मैदानावर मूक आंदोलन करण्यात येणार आहे. आम्ही बोललो, समाज बोलला आता लोकप्रतिनिधींनी बोलावं, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून करण्यात आलं आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सोमवारी 21 जून रोजी नाशकात मूक आंदोलन करण्यात येणार आहे. युवराज संभाजीराजेंच्या उपस्थित हे आंदोलन होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे.
मराठा आरक्षणासाठी उद्यापासून मूक आंदोलन
सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी सोमवारी 21 जून रोजी नाशकात मूक आंदोलन करण्यात येणार आहे. मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधींना पत्र देन्यात येणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून छत्रपती संभाजी राजेंनी 6 जूनला किल्ले रायगडावरून आंदोलनाची हाक दिली होती. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून 16 जूनपासून टप्प्याटप्प्याने राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर बुधवारी कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराज यांच्या समवेत आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे.
या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी नाशिकमधील रावसाहेब थोरात सभागृहाच्या मैदानावर मराठा समाज बांधवांच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी आम्ही बोललो, समाज बोलला आता लोकप्रतिनिधींनी बोलावं यासाठी जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे. यावेळी लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडावी मात्र आंदोलनाला गैरहजर राहणारे लोकप्रतिनिधी समाजासाठी गंभीर नसून त्यांच्या विरोधात देखील आंदोलन करण्याचा इशारा आज नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा समन्वयकांनी दिला आहे.
काळा गणवेश, काळा मास्क घालून मूक आंदोलन होणार -
आंदोलनाच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी आपले मत माडावे. या आंदोलनात सर्वजण काळा गणवेश, काळा मास्क घालून आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून आंदोलन करण्यात येईल. तसेच लोकप्रतिनिधींचा अनादर होणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल. रावसाहेब थोरात येथील मैदानात युवराज संभाजी राजेंच्या उपस्थित आंदोलन होणार आहे. 16 जूनला सकाळी दहा ते दुपारी एक वाजेच्या दरम्यान हे आंदोलन करण्यात येणार असून, उद्या कोल्हापूरमधून या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर पुढे प्रत्येक दिवशी टप्प्याटप्प्याने नाशिक, औरंगाबाद, अमरावती, जालना, सोलापूर आणि नवी मुंबई या पाच जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करण्यात येणार आहे. आरक्षणासाठी मराठा समाज आता आक्रमक झाल्याने आता या आंदोलनाकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.