नाशिक: योगा विषयात संशोधन करणाऱ्या 14 वर्षीय गीत पटणीला 2 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांच्या डॉक्टरेट. कोरोना काळात घरात असतांना वेळेचा सदुपयोग करत नाशिकच्या 14 वर्षीय गीत हिने मुलांकडून होणाऱ्या मोबाईल आणि इतर गॅझेटसचा अधिक वापराचा आरोग्यावर होणारा परिणाम Effects on health आणि योगावर प्रबंध सादर Dissertation submitted on Yoga करत तिने कोलंबिया आणि घाना या 2 आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची डॉक्टरेट पदवी मिळवली आहे. इतक्या लहान वयात तिने संपादित केलेल्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दोन अंतराष्ट्रीय विद्यापीठांची डॉक्टरेट एकदाच मिळवणारी गीत देशातील सर्वात लहान असल्याचा दावा गीतच्या कुटूंबानी केला आहे.
लहानपणापासून योगाची आवड : गीत पटणी नाशिक शहरातील निर्मला कॉन्व्हेन्ट शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकते. वडील पराग पटणी आणि आई काजल पटणी दोघेही पेशाने डॉक्टर असल्यामुळे त्यांचा फिटनेसवर जास्त भर असतो. आणि त्यामुळे लहानपणापासून गीतला योगाची आवड निर्माण झाली. मात्र गीतने स्वतः योगामध्ये प्राविण्य तर मिळवले, पण कमी वयात योगाचे क्लास देखील ती घेते. कोरोना काळात क्लास घेत असताना तिच्या अस लक्षात आले की सद्या ऑनलाईन शाळा सुरू असल्याने मुल मोबाईल आणि इतर गॅझेटसचा अधिक वापर करत आहेत.
7 नामांकित विद्यापीठांत प्रबंध : यामुळे त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी गीतने 'कोरोना काळात लहान मुलांकडून मोबाईलसह इतर गॅझेटचा वापर आणि त्याचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम व योग अभ्यासातून त्यावर उपाय' या विषयावर प्रबंध तयार करून जगभरातील 7 नामांकित विद्यापीठांना सादर केला होता. त्यातून कोलंबिया आणि घाना या 2 अंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी गीतच्या संशोधनाची दखल घेत तिला डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे.
योगामध्येच करणार करिअर : गीतला लहानपणापासूनच योगाची आवड आहे. तिने त्यात प्राविण्यही मिळवले आहे. तसेच आतापर्यंत शेकडो जणांना योगाचे धडे दिले आहेत. आपल शरीर जर तंदुरुस्त ठेवायचं असेल, तर प्रत्येकाने योगा करणे खूप गरजेचे आहे, अस ती सांगते. आणि योगाचा खोलवर अभ्यास करत तिने डॉक्टरेट मिळवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. आई वडिलांची मदत आणि माझे प्रयत्न यामुळे कमी वयात मी अंतरराष्ट्रीय विद्यापीठांची डॉक्टरेट मिळू शकल्याचा आनंद असल्याचं गीत पटणी हिने म्हटले आहे.
मुलीचा अभिमान गीत ही लहानपणापासून हुशार आहे. कोणतही काम ती अगदी मन लावून करते. तिने योगा विषय खोलवर अभ्यास करून स्वतः एक चांगली योग शिक्षक झाली आहे. आतापर्यंत तिला अनेक पुरस्कार मिळवले आहेत. आम्हाला आमच्या मुलीचा अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया गीतचे वडील पराग पटणी यांनी दिली आहे.